वेकोलिच्या ब्लॉस्टींग मुळे बापासह लेकीचा दुदैवी मृत्यु दोषी अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

वेकोलिच्या ब्लॉस्टींग मुळे बापासह लेकीचा दुदैवी मृत्यु

दोषी अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कन्हान,ता.२८ ऑगस्ट

    वेकोलि कामठी खुली खदान च्या दगान (ब्लॉस्टींग) मुळे वार्ड क्र.१ हरीहर नगर, कांद्री येथील घर कोसळल्याने मलमा खाली बापासह सहा वर्षाच्या लेकीचा घटनास्थळीच मृत्यु झाला. ही धक्कादायक घटना घडताच परिसरात शोककळा पसरून भितीचे वातावरण निर्माण झाल्याने वेकोलिने ब्लॉस्टींग बंद करून संबधित दोषी अधिका-यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करित आहे.

       कोळसा उत्खनना करिता वेकोलि मागिल काही महिन्या पासुन वेकोलि अधिका-यांच्या बेजबावदार पणे व मनमानी कारभार करित कोळसा मिश्रीत माती डंम्पिंग कन्हान परिसरात करून उंचच उंच कृत्रिम टेकडया निर्माण करित आहे. या कोळसा मिश्रीत मातीचे धुळ प्रदुर्शनाने कन्हान, पिपरी व कांद्री तील ३ किमी परिसरातील नागरिकांना आरोग्याचे दुष्य परिणाम भोगावे लागत आहे.

   माती व कोळसा उत्खनना करिता करण्यात येणा-या मोठया प्रमाणात बारूद दगानी (ब्लॉस्टींग) मुळे लोकांच्या घरांना हादरे बसुन घराला भेगा पडुन घराचे नुकसान होत आहे. या विषयी विविध संघटन द्वारे अनेकदा तक्रार नोंदविल्या तरी वेकोलि कामठी खुली खदान च्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याने आज सोमवार (दि.२८) ऑगस्ट ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान हरीहर नगर, कांद्री येथील कमलेश गजानन कोठेकर (वय-३५ ) यांचे घर खदान च्या दगानी (ब्लॉस्टींग) मुळे कोसळुन त्यात कमलेश कोटेकर व कु.यादवी कोठेकर(वय-६) मुलगी या बापासह मुलीचा घराच्या मलम्यात दबुन दुर्देवी मृत्यु झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने वेकोलि प्रशासनाने ही दगान (ब्लास्टींग) बंद करण्यात यावी आणि संबधित दोषी वेकोलि अधिका-यावर तिव्र रोष व्यकत करित मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची संतप्त नागरिकांनी मागणी करित आहे.

       घटनेची माहीती मिळताच कांद्री ग्रा.प.माजी सरपंच बळवंत पडोळे, माजी उपसरपंच श्याम बर्वे, माजी जि.प सदस्य योगेश वाडीभस्मे, नरेश पोटभरे सह बरेच मान्यवर उपस्थित झाले. पारशिवनी प्रभारी तहसिलदार रंजित दुसावार, तलाठी श्रीरसागर, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहाते आपल्या स्टाप सह पोहचुन दोन्ही मुत्युदेह शवविच्छेदना करिता कामठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. बातमी लिहे पर्यंत वेकोलि अधिकारी घटनास्थळी येण्यास तयार होत नव्हते.

     मुतक कमलेश कोठेकर यांचे नागपुर जबलपुर रोडवर धर्मराज शाळे सामोर छोटेशे सलुन चे दुकान चालवुन आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करित होता. घरचा कर्ता पुरूष व छोटीशी मुलीचा दुदैवी मुत्यु झाल्याने पत्नी व छोटयाशा मुलासह त्याच्या परिवारा वर संकटाचे डोंगर कोसळले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संतप्त नागरिकांनी वेकोलि चेक पोस्ट वर मुतदेह सह चार तास केले धरणे आंदोलन सुनिल केदार यांच्या पुढाकारे मृतकाच्या पत्नीस वेकोलि खदान मध्ये कंत्राटी नौकरी व नुकसान भरपाई चे दिले आश्वासन. 

Tue Aug 29 , 2023
संतप्त नागरिकांनी वेकोलि चेक पोस्ट वर मुतदेह सह चार तास केले धरणे आंदोलन सुनिल केदार यांच्या पुढाकारे मृतकाच्या पत्नीस वेकोलि खदान मध्ये कंत्राटी नौकरी व नुकसान भरपाई चे दिले आश्वासन. कन्हान,ता.२९ ऑगस्ट     वेकोलि कामठी खुली कोळसा खदान च्या ब्लॉस्टिंग च्या हादराने घर कोसळुन मलब्यात दबुन खाटेवर आराम करित […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta