*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती पारशीवनी यांच्या वतिने समाज प्रबोधनात्मक धुलिवंदन महोत्सव संपन्न*
कमलसिंह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
*पारशिवनी*(ता प्र):-पारशिवनी येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्था व वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धुलिवंदन महोत्सव समिती यांच्या संयुक्त वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा होळी धुलीवंदन महोत्सव covid-19 या नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री मोहन जी लोहकरे संस्थेचे अध्यक्ष श्री आनंदरावजी इंगुळकर संस्थेचे सहसचिव श्री ईश्वर जी ढोबळे, श्री उमाकांत जी बांगडकर, अमोल सावरकर, बंडू जी कोटगुले, गौतम सावरकर, प्रा. नीताताई इटनकर , रवि नाकतोडे, परसराम राऊत, सविता लोहकरे,तसेच पारशिवनी शहरातील सेवाधारी,प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून तसेच महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्री मोहनजी लोहकरे यांच्या निवासस्थानी सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या वेळी *संस्थेचे सचिव मोहन लोहकरे यांनी सागीतले कि कार्यक्रमाचा उद्देश लाकडाची होळी जाण्यापेक्षा वाईट विचारांची होळी जाळण्यात यावी व राष्ट्रसंतांचे विचार हे घरोघरी पोचण्या करिता एक नवीन माणूस घडविण्याकरिता हा होळी धुलीवंदन महोत्सव आम्ही दहा वर्षापासून साजरा करत आहोत कुठलेही व्यसन न करता* *कुठल्याही पशु प्राण्यांची हत्या न करता कुठलाही रंग गुलाल न लावता हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे साजरा* करीतआहोतअसे मत संस्थेचे सचिव मोहन लोहकरे यांनी माडले या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता श्री मोहन जी लोहकरे श्री ईश्वर ढोबळे बंडू कोटगुले व सर्व ग्रामस्थ संस्थेचे सभासद यांचे सहकार्य लाभले.