राखेच्या प्रदूषणापासून करणार मुक्त
नांदगाव येथील शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांचे आश्वासन; ७० टक्के राख काढण्यात आली
कन्हान, ता. २८ ऑगस्ट
शेतकरी व ग्रामस्थांना राखेपासून होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्त करण्यात येईल, असे आश्वासन युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. नांदगाव-बखारी शिवारात पेंच नदीच्या जवळ राख तलाव असून येथील राखेमुळे नांदगाव परिसरातील शेती आणि ग्रामस्थांच्या जीवनावर वाईट परिणाम होत आहे. या परिसराला आदित्य ठाकरे यांनी रविवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करताना आश्वासन दिले.
खापरखेडा विद्युत केंद्रातील राखेमुळे पारशिवनी तालुक्यातील नांदगाव-बखारी गावातील ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत आहे. शेतीचेही नुकसान होत असल्याची शेतकऱ्यांची ओरड होती. याविरोधात आंदोलन करण्यात आले. पर्यावरण मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी नांदगाव राख तलावातील राखेचा उपसा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आतापर्यंत ७० टक्के राख काढण्यातही आली. तरीही येथील प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही. आज, रविवारी, आदित्य ठाकरे हे पारशिवनी तालुक्यात आले. यावेळी त्यांनी नांदगाव-बखारी गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा केली. तसेच येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी रामटेक माजी खासदार प्रकाश जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, जिल्हा प्रमुख (ग्रा.) राजू हरणे, उत्तम कापसे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम नवले, रामटेक विधानसभा संघटक प्रेम रोडेकर, संभाजी ब्रिगेड नागपूर जिल्हा (ग्रा.) अध्यक्ष संजय कानतोडे,शांताराम जळते, रवींद्र ठाकरे उपस्थित होते. दरम्यान त्यांनी कोळसा खाणीमुळे त्रस्त झालेल्या वराडा, एंसवा गावातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात नांदगाव सरपंच सोनाली मनोज वरखडे, उपसरपंच सेवक कृष्णा ठाकरे, देवा ठाकरे, वराडा सरपंच विद्या दिलीप चिखले, क्रिष्णा खिळेकर,रामभाऊ ठाकरे, धर्मेंद्र रच्छोरे, अजयसिंह राजगिऱ्हे, रवी रच्छोरे, वनदेव वडे, किशोर ठाकरे, जागेश्वर पुन्हे, गेंदलाल रच्छोरे, संतोष उपाध्ये, नीलेश गिरी, देवचंद चव्हाण, तुषार ठाकरे, दशरथ गिरी, रामकृष्ण शिंद, मेश्राम, आकाश ठाकरे, ललित धानोले, राज ठाकरे, तेजराम खिळेकर, गोरले, लताबाई ठाकरे, माया पुन्हे, ज्योती ठाकरे, विजया बडे, अश्विनी ठाकरे उपस्थित होते.
Post Views: 940
Tue Aug 30 , 2022
लाखनी भंडारा येथे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार कामठी,ता.30 ऑगस्ट लाखनी,भंडारा येथे राष्ट्रीय अमर कला निकेतन अंतर्गत गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सव, 28 आणि 29 ऑगस्ट दोन दिवसीय आयोजित कार्यक्रमात, संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहिर अंबादास नागदेवे आणि संजय वनवे, युवा शाहिर आर्यन नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहिर […]