गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाचे निरोप
न.प. द्वारे कृत्रिम टँकचा व्यवस्था, पोलीसांच्या चोख बंदोबस्तात बाप्पाचे शांततेत विर्सजन
कन्हान,ता.२९
कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात दहा दिवस गणेश मुर्तीची विधिवत पूजा अर्चना, भजन कीर्तन, विविध कार्यक्रम सादर करुन अनंत चतुर्दशी च्या दिवशी काली मंदिर नदी काठावर नगर परिषद प्रशासना द्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम टॅंक व नदी पात्रात गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात गणपतीचे विर्सजन करुन दहा दिवसीय गणेशोत्सवाची सांगता करण्यात आली.
मंगळवार (दि.१९) सप्टेंबर ला गणेश चतुर्थी च्या दिवशी शहरात आणि ग्रामीण भागात सार्वजनिक मंडळांनी व घरोघरी ७१५ व सार्वजनिक शहर ११ आणि ग्रामिण १९ श्री गणेशाची स्थापना करून विधिवत पूजा अर्चना करुन गणेश मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.
सतत दहा दिवस गणेशोत्सव निमित्य सार्वजनिक मंडळ व घरोघरी रोज गणेश मुर्तीची आरती, पुजा अर्चना, भजन कीर्तन, रंगारंग कार्यक्रम सह विविध कार्यक्रम करण्यात आले. तोतलाडोह आणि पेंच धरणातुन नदी पात्रात सातत्याने पाणी सोडले जात असल्याने दुधळी वाहत नदी च्या पाणी पात्रात वाढ झाली होती. गुरुवार (दि.२८) सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी च्या दिवशी काली मंदिर नदी काठावर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडु नये म्हणुन नगर परिषद प्रशासना द्वारे नदी काठावर बाप्पाचे विर्सजन करण्याकरिता कृत्रिम टॅंकची व्यवस्था करण्यात आली होती.
तीन दिवसा करीता काली मंदिर सत्रापुर, कन्हान नदी काठावर नगरपरिषद द्वारे गणेश विसर्जनाकरिता विधृत (लाईटस), कृत्रिम टॅंक, ढिवर समाज संघटनाचे पथक व संपुर्ण व्यवस्था करण्यात आल्याने शहर व परिसरातील नारिकांनी घरघुती व सार्वजनिक श्री गणेश मुर्तीचे दुपार पासुन नागरिकांनी ढोल, ताशांचा गजरात, गुलाल उधळुन गणपती बाप्पाला निरोप देण्याकरिता पुजा अर्चना करुन गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात कुत्रिम टॅंक मध्ये बाप्पाचे विर्सजन करुन निरोप दिला.
ढिवर सेवा समाज संघटन कन्हान शाखेच्या सदस्यांचा सहकार्याने सार्वजनिक गणपती चे विसर्जन नदी पात्रात करण्यात आले. यावेळी नदी काठावर पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक भटकर यांच्या मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्तासाठी वीस पोलीस अधिकारी व १४० पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी ४५ चमुला प्राचारण करण्यात आले होते.
त्यामुळे विसर्जन शांततेत मोठ्या आनंदात पार पडले. गणेश मुर्तीचे काली मंदिर कन्हान नदी काठावर विर्सजन करावे असे कडकडीचे आवाहन नगराध्यक्षा सौ.करूणाताई आष्टणकर यांनी केले होते. प्रसंगी ढिवर समाज संघटन अध्यक्ष सुतेश मारबते, राजु मारबते, मोहन वाहिले, रेखा भोयर, बंडुजी केवट, धर्मराज खंटाटे, रवि केवट, सामाजिक कार्यकर्ते सह नप अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 763
Fri Sep 29 , 2023
शिवसेना (उबाठा) पक्ष व नागरिकांनी जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता कन्हान : – श्री गणेशोत्सवा निमित्य कन्हान, सत्रापुर व लेबर कँम्प च्या नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या सहकार्याने स्वयंफुर्त श्रमदान करून जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता अभियान राबवुन साफ सफाई करून स्वच्छता केली. […]