शिवसेना (उबाठा) पक्ष व नागरिकांनी जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता
कन्हान : – श्री गणेशोत्सवा निमित्य कन्हान, सत्रापुर व लेबर कँम्प च्या नागरिकांनी शिवसेना उध्दव बाळा साहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या सहकार्याने स्वयंफुर्त श्रमदान करून जुन्या कन्हान नदी पुलावर स्वच्छता अभियान राबवुन साफ सफाई करून स्वच्छता केली.
ब्रिटिश काळीन पुरातन १५० वर्ष सेवा देणाऱ्या कन्हान नदीच्या जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणात गवत, झाडी, कचरा वाढल्याने पुलाची दैनाअवस्था झाली होती. रोज सकाळी फिरण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना तसेच दिवसा व रात्र अंत्यविधी करिता पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना वाढलेल्या झाडी, गवतामुळे नेहमी विषारी जनावर आणि झाडी झुडपी मुळे येण्या जाण्या-यास त्रास होत होता. याकडे शासन, प्रशानाचे होत असलेले दुर्लक्षतेला वाचा फोडण्या करिता कन्हान सत्रापुर व लेबर कॅम्प प्रभाग क्र ८ च्या नगरसेविका मोनिकाताई पौनीकर यांनी दिलेल्या नगरपरिषदेच्या दोन कर्मचा-यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी स्वयंफुर्त श्रमदान करित संपुर्ण जुन्या कन्हान नदी पुलावर वाढलेले गवत , झाडी, झुडपी व कचरा काढुन पुलाची स्वच्छता करण्यात आली.
याप्रसंगी कामगार सेना जिला प्रमुख समीर मेश्राम, तालुका प्रमुख कैलास खंडार, उमेश पौनिकर, तालुका संघटक गणेश मस्के, राजन मनघटे, प्रभाकर बावणे, गोलु थवाईत, विलास टेम्बुर्णे, दीपक ठाकुर, सुमित जांभुळकर, राणु सिन्हा, रामेश्वर ठाकुर, आदित्य जांभु ळकर, मनोज ठाकुर, विजय वाघमारे, विशाल शेंडे, अमोल कठाणे, महेंद्र वानखेडे, भूपेंद्र पडोती सह नाग रिकांनी उपस्थित राहु श्रमदान करून संपुर्ण कन्हान नदी पुलावर साफ सफाई करून स्वच्छता करण्यात आली.
Post Views: 780
Sun Oct 1 , 2023
भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्था कडुन विसर्जनानंतर स्वच्छता मोहीम कन्हान,ता.३० गणपती विसर्जनानंतर रविवार सकाळी काली माता मंदिर,कन्हान नदी किनाऱ्यावर भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ” आपले कन्हान शहर आपली जबाबदारी” असे म्हणत चिंटू वाकुडकर यांच्या नेतृत्वाखाली दीड दिवस, पाच दिवस, दहा दिवस गणपती विसर्जन केल्यानंतर सर्वत्र कचरा […]