वर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज
कामठी :३० नोव्हेंबर २०२० रोजी मा . ना . श्री नितिन गडकरी व मा . श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार वर्धापन दिन सोहळा . कार्तिक पौर्णिमच्या पावन पर्वावर विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलव्या २१ व्या वर्धापन दिना निमित्त ३० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता भारतीय प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत विशेष बुध्द वंदना व धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . ड्रॅगन पॅलेस टेम्पलचा वर्धापन दिन दरवर्षी मोठया स्वरूपात साजरा करण्यात येतो परंतु या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जपान येथील प्रमुख भिक्षु संघाची उपस्थिती राहणार नाही ड्रॅगन पॅलेस टेम्पल नुतनीकरण अंतर्गत सुशोभिकरणाचे कार्य मोठया प्रमाणात झाले आहे . त्यामध्ये ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या छतावरील जुने ईटालीयन मोजॅक टाईल्स पुर्णपने बदलुन नवीन ईटालीयन मोजॅक ग्लास वास्तु विशारदांच्या देखरेखीखाली लावण्यात आले आहे .
ड्रॅगन पॅलेस टेम्पलला लागलेल्या ग्रेनाईट व मार्बलते पॉलीशिंग करण्यात आले आहे . बेल्झीयम वरून निर्यात केलेल्या ग्लासेसवर आर्कषित फुलांची कलाकृती करुन ड्रॅगन पॅलेस टेम्पलल्या मुख्य प्राथना सभागृहात लातण्यात आलेले आहे . तसेत ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ५ एकर जागेतील लॉनवे नुतनीकरण करण्यात आले आहे . बगीच्याचे संपूर्णत : सुशोभिकरण करण्यात आले आहे . पुरुष व महिलांसाठी नवीन आधुनिक स्वरूपातील स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे . ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथील फॉउन्टनला ( Fountain ) रंगबीरंगी प्रकाशानी सुसज्जीत करण्यात आले आहे .
ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ४:०० वाजात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या नुतनीकरणाचे लोकार्पण सोहळा मा . ना श्री . नितीनजी गडकरी , मंत्री , केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग , शुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय , भारत सरकार , न्यु दिल्ली व मा . श्री . देवेंद्रजी फडणविस , माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य , मुंबई . मा . श्री . चंद्रशेखर बावनकुळे , माजी पालकमंत्री नागपूर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे राहतील . कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे मार्च २०२० पासुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल भाविकांच्या प्रवेशाकरिता बंद करण्यात आले होते . ड्रॅगन पॅलेस टेम्पल च्या वर्धापन दिना निमित्त सोमवार दिनांक 30 नोव्हेंबर २०२० पासुन ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे नवीन स्वरूपात लोकांकरिता खुले करण्याचा आनंद होत असुन ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देणा – यांना मास्क घालुन येने अनिवार्य राहील तसेच प्रवेश करतांना प्रत्येक व्यक्तीकरिता प्रवेश द्वारावर सेनेट्राईजरची व्यवस्था करण्यात आली आहे . अशी माहीती ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख व ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा मा . अॅड . सुलेखाताई कुंभारे यांनी पत्रकाद्वारे दिली .