सावनेर बाजार चौकातील एटीएम फोडले
१५ मिनीटाच्या चोरीत १० लाख ३६ हजारांची रक्कम लंपास
सावनेर : गॅस वेल्डींग कटरने एसबीआय चे एटीएम फोडून दहा लाख छत्तीस हजाराची रक्कम चोरटयांनी उडवीली ही घटना आज पहाटे 3:53 च्या सुमारास बाजार चौकातील शासकीय दुध डेअरी च्या काही अंतरावर असलेल्या घटे यांच्या घराशेजारील असलेल्या एटीएम मध्ये घडली.
सीसीटीव्ही फुटेज च्या रेकॉर्डींग नुसार आज दि. 30 रोजी पहाटे 3:53-55 च्या सुमारास वरणा कारने काही चार ते पाच लोकांनी येवून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले बाजूला असलेल्या एचडीएफसी च्या एटीएम मध्ये असलेला कॅमेरा तोडला व नंतर एसबी आयचे एटीएम गॅस कटरने तोडून त्यातील दहा लाख 36 हजाराची रक्कम घेवून चोरटे पसार झाले. यासंमधी मकान मालक प्रविण घटे यांनी सावनेर पोलिसांना पाच मिनिटात फोनकरून माहिती दिली.
सावनेर येथून एटीएम फोडून चोर हे नागपूर दिशेने पळाले मात्र पाटणसावंगी टोल नाक्यावर टोल न भरता एका ट्रक मागून आपली कार काढून चोरटयांनी धूम ठोकली असे बोलले जात आहे.
एचडीएफसी बैंकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, कॅमेरे केले काळे; सायरन वाजले आणि चोरटे पसार…
बस स्थानक जवळील बसवार कॉम्लेक्स येथील एचडीएफसी बैकेच्या एटीएमची रात्री 1:30 च्या सुमारास दोघांनी कारने येवून पहाणी करून गेले व पहाटे 3:53 ला येवून बैंकेचे कॅमेरे काळे करून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र बैंकेचे सायरन वाजल्याने चोरटयांनी धुम ठोकली.