रामधामचा उत्सवामधून निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा
रामधाम तीर्थक्षेत्र मनसर येथे पंधरा वर्षांत १२६६ निशुल्क विवाह संपन्न
कन्हान,ता.३० एप्रिल
चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने रामधाम तीर्थ मनसर येथे आयोजित निशुल्क आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा मा.सुनीलबाबू केदार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावनेर यांचा अध्यक्षतेखाली मा.चंद्रपालजी चौकसे (संस्थापक, रामधाम तीर्थ मनसर), सौ.संध्याताई चंद्रपाल चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर), गौरव चंद्रपाल चौकसे, सूर्यपाल चौकसे, महिपाल चौकसे, सौ. दीपालीताई चौकसे यांचा प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ग्रा.प. मनसर येथून ५५ नवरदेवाची वरात ट्रॅक्टर वर, डी.जे.पड, बँड, आदिवासी नुत्य व संगीतमय वातावरणात वरात काढण्यात आली. ५५ जोडप्यांचे (१ बोद्ध समाज, १० हिंदू समाज व ४४ आदिवासी) समाजाचे विवाह त्याचा रितीरिवाजा प्रमाणे लग्न लावण्यात आले.
चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर तर्फे सर्व नवदाम्पत्यास संसाराला उपयुक्त भेटवस्तू देण्यात आले. चंद्रपाल चौकसे यांनी भावनिक होऊन सांगितले की, आईला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या उत्पनातून कमीत-कमी १०% रक्कम ही समाजकार्यासाठी खर्च करतो. त्यामुळे कोणतेही कर्ज न घेता दरवर्षी ज्यांची लग्न करायची आर्थिक परिस्थिती नाही अशा हजारो जोडप्यांचे येथे निशुल्क लग्न लावण्यात येते. विदर्भातील हा एकमेव विवाह सोहळा मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. लग्न सोहळ्यात आलेल्या हजारो लोकांना स्वादिस्ट भोजन देण्यात येते, आता पर्यंत येथे १२६६ विवाह संपन्न झालेले आहे.
कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा. सुनील केदार आमदार सावनेर विधानसभा यांनी सांगितले की, चंद्रपाल चौकसे व चौकसे परिवार यांनी आपले जीवनात अखंड समाज सेवेचा जिवंत उदाहरण विवाह सोहळ्याचा माध्यमातून प्रस्तुत केलेला आहे. हे नेहमीच समाजकार्य करतात त्यांचा या कार्याला तोड नाही त्यांचा या कार्याला व वर वधुना या वेळी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी प्रामुख्याने दयाराम राय (राष्ट्रीय अध्यक्ष, पंचायती राज सरपंच संघटन), मा.सौ.रश्मिताई बर्वे (माजी अध्यक्षा जी.प. नागपुर), हुकूमचंदजी आमधरे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई) संजय पवार (अध्यक्ष,आधार बहुुद्देशिय संस्था नागपुर), शंकऱजी चहांदे (माजी जी.प.सदस्य नागपुर), मा. करुणाताई भोवते (उपसभापती पं.स. पारशिवनी), सौ.कलाताई ठाकरे (माजी सभापती पं.स. रामटेक तथा सदस्य पं.स. रामटेक), सौ.अस्विताताई बिरणवार सदस्य पं.स. रामटेक), अनिल पेंगरेकर, डॉ. वैशालि चोपडे, महेशजी बमनोटे (माजी सभापती), पी.टी. रघुवंशी, बबलू दुधबर्वे, नासिर शेख, सौ. शोभाताई राऊत (माजी नगराध्यक्ष, रामटेक), संजयजी बिसमोगरे माजी नगरसेवक रामटेक), सौ. शारदा बर्वे, सौ. विमलताई नागपुरे, सौ. रंजनाताई मस्के, सौ. कांचनमाला माकडे, हेमंत जैन, बन्सीलाल बमनोटे, शरद गुप्ता, हरिभाऊ तुपट, जयराम महाजन, रामदास मथुरे, मोहन कोठेकर, धर्मेंद्र दुपारे, ताराचंद ठाकरे, देवाजी दुधपचारे, शिवराम महाजन, अजय खेडगरकर, रवी बावनकुळे, रितेश कुमरे, प्रीतम मोहबिया, शिवराम वरठी, मोतीराम खंडाते, तुळसीराम वाडीवे, गणाराम धुर्वे, तिरजू नराठी उपस्थित होते.
Post Views: 739
Sun Apr 30 , 2023
१ मे महाराष्ट्र दिनी आरोग्य तपासणी आणि आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर कन्हान,ता.३० एप्रिल १ मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवसा निमित्य शहर विकास मंच कन्हान द्वारे भव्य मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य (हेल्थ) कार्ड वाटप शिबीर आणि कामगारांचा भव्य सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. […]