विज पडुन शेतकरी दीपक महल्ले चा मुत्यु

विज पडुन शेतकरी दीपक महल्ले चा मुत्यु

कन्हान, ता.30 जुलै

   एसंबा (सालवा) शेतातील बांधीत दोघे काम करताना एका एक जोरदार पाऊस येण्या अगोदर जोराच्या कडाक्या सह अंगावर विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटनास्थळीच मुत्यु झाला.

 शनिवार (दि.३०) जुलै ला दुपारी कन्हान परिसरात जोरदार विज गर्जेनेसह पाऊस आल्याने मौदा तालुक्यातील एंसबा (सालवा) शेत शिवारात शेतकरी दिपक पाडुरंग महल्ले वय ५४ वर्ष राह. एंसबा (सालवा) यांची ४ एकर शेती असुन शेतात धानाची लावण करण्याकरिता ट्रक्टरने चिखल करून बांध्यात जावई नेपाल मनोहर फुटाणे व दीपक महल्ले हे दोघेही बांध्यात काम करित होते. दुपारी १ वाजता दरम्यान एकाएक जोरदार विज गर्जेनेसह पाऊस येऊन शेतक री दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन त्यांचे कपडे जळुन शरीर भाजुन घटनास्थळीच त्याचा मुत्यु झाला. बाजुच्या बांधीत काम करणारे जावाई नेपाल फुटाणे यांना अमोल महल्ले ला बोलावुन पाहीले तर दिपक महल्ले यांचे अंगजळुन मुत्यु झाल्याचे दिसल्याने त्याना उचलुन वाहनाने कन्हान पोलीस स्टेशन ला कळवुन कामठी ग्रामिण उपजिल्हा रूग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरानी त्यांचा घटनास्ळीच मुत्यु झाल्याचे घोषित केल्याने कन्हान पोस्टेला पुतण्या अमोल सुधाकर महल्ले यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे.

शेतकरी दीपक महल्ले च्या कुंटुबास शासनाने त्वरित आर्थिक मदत करावी.

  एंसबा (सालवा) येथील शेतीत शेतकरी दिपक महल्ले यांच्या अंगावर विज पडुन मुत्यु झाल्याने त्यांच्या परिवारातील पत्नी, दोन मुली, दोन मुले यांच्या दु:खाचा डोंगर कोसळुन शेतक-याचा परिवार हवालदिल होत आर्थिक संकटात सापडल्याने शासन, प्रशासनाने या कुंटुंबास तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी एंसबा व परिसरातील ग्रामस्थ शेतक-यांनी केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

'दामिनी' ॲपमुळे विजेपासून प्रतिबंधात्मक उपाय

Fri Aug 5 , 2022
‘दामिनी’ ॲपमुळे विजेपासून प्रतिबंधात्मक उपाय वीज कुठे पडणार ? १५ मिनीटांपूर्वीच मिळणार सूचना कन्हान, ता. 5 ऑगस्ट मान्सून काळात वीज पडून होणारी जीवितहाणी प्रतिबंधात्मक टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी ‘दामिनी’ अॅप तयार केले आहे. सदा अप गुगल पे स्टोअरवर आहे. उपलब्ध सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून मोबाईलमध्ये […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta