लाखनी भंडारा येथे शाहीर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार
कामठी,ता.30 ऑगस्ट
लाखनी,भंडारा येथे राष्ट्रीय अमर कला निकेतन अंतर्गत गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सव, 28 आणि 29 ऑगस्ट दोन दिवसीय आयोजित कार्यक्रमात, संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ लोकशाहिर अंबादास नागदेवे आणि संजय वनवे, युवा शाहिर आर्यन नागदेवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे (आकाशवाणी कॅसेट सिंगर ) यांचे शाल श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शाहीर श्रीराम मेश्राम, तीतूरवाले, ज्येष्ठ शाहीर माणिकराव देशमुख, शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आले. यावेळी शाहीर अरुण मेश्राम, अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद, रामटेक तालुका, शाहीर भगवान लांजेवार अध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद, पारशीवनी तालुका, शाहीर चिरकूट पुनडेकर, शा.गजानन वडे, शा. विरेन्द्र सिंह शेंगर, शा.शिशुपाल अतकरे, शा.विक्रम वांढरे, भुपेश बावनकुळे, शा.वासुदेव नेवारे, शा.रवींद्र मेश्राम, शा. प्रदीप कडबे, युवराज अडकणे, शा.रमेश रामटेके, दर्शन मेश्राम, शा.शालीक शेंडे, प्रफुल भणारे, गिरीधर बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमा मध्ये मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.
Post Views: 883
Wed Aug 31 , 2022
उद्याला नितीन गडकरी यांच्या हस्ते पूलाचे लोकार्पण सोहळा गडकरी कोणकोणत्या कामांची घोषणा करणार, कोणते प्रकल्प, सर्वाचे लक्ष माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन यांचा मार्गदर्शनात गडकरी साहेबांचे जंगी स्वागत कन्हान,ता.1 सप्टेंबर केंन्द्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी उद्याला कन्हान नगरीत येत असून नागपुर- जबलपुर रोडवरील कन्हान येथे कन्हान नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम प्रकल्प […]