सावनेर व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी गठीत.. अतुल पाटील अध्यक्ष तर दिनेश दमाहे सचिव पदी

सावनेर व्यापारी संघाची नवी कार्यकारिणी गठीत..
अतुल पाटील अध्यक्ष तर दिनेश दमाहे सचिव पदी

सावनेर – 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी झालेल्या सावनेर व्यापारी संघाच्या बैठकीत सर्व सावनेर व्यापारीच्या सहमतीने नवी कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्षपद व्यापारी संघाचे निवृत्त अध्यक्ष विनोद जैन यांनी भूषवले, आणि सचिव मनोज बसवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. माजी कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी यांचे पुष्पगुछ देऊन निरोप देण्यात आला तर नवीन पदाधिकारी व कार्यकारिनी सदस्यांचे स्वागत करण्यात आले.


बैठकीत नवी कार्यकारिणीच्या 14 सदस्यांची घोषणा करण्यात आली असुन नवी कार्यकारिणीमध्ये अतुल पाटील अध्यक्षपदी,  दिनेश दमाहे सचिवपदी,  राहुल बारई उपाध्यक्षपदी, पवन जामदार कोषाध्यक्षपदी, दिपक भोंगाडे सहसचिवपदी, तर किशोर अंतुरकर सहकोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली.
तसेच कार्यकारिनी सदस्यांमध्ये विजय पुण्यानी, संजय चंदवानी, प्रफुल्ल चंदनखेड़े, गिरीश बनाईत, विजय पांडे, लिलेश घटे, आशिष सोनभद्रे, जाहीद शेख, पियुष झुनझुनवडिया यांचा समावेश आहे. माजी पदाधिकारी यांनी युवा वर्गाकडे सावनेर व्यापारी संघाची जबाबदारी सोपवून सर्व व्यापारीबंधुच्या हिताचे प्रश्न हाताळतील अशी आशा व्यक्त करीत नव्या कार्यकारिणीत तरुणांना प्राधान्य दिल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले पाहवयास दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सुनील केदार यांच्या हस्ते उत्कृष्ट बैल जोड्यांना पुरस्कार

Tue Sep 3 , 2024
सुनील केदार यांच्या हस्ते उत्कृष्ट बैल जोड्यांना पुरस्कार सावनेर : पारंपारिक पद्धतीने माताखेडी पोळा मैदानात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केदारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शंभराहून अधिक बैल जोडी मालकांना दुपट्टा व भोजारा देऊन सन्मान करण्यात आला तसेच आयोजकातर्फे उत्कृष्ट बैलजोडींना मानाचा पुरस्कार माजी आमदार मंत्री सुनील केदार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta