*किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून विद्युत बंद*,
उपकार्यकारी अभियंता,एस,डि,ओ,तहसिलदार यांना ग्रा पं कोलितमारा तफै निवेदन दिले
कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुकयातिल किरंगी सर्रा या गावातील मागील दोन 2 महिन्यापासून महापुर पासुन बंद असलेला विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी उपकार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण पारशिवनी ,उपविभागिय अधिकारी,रामटेका ,व तहसिलदार यांना गट ग्राम पंचायत कोलितमारा चे सरपंच ,उपसरपंच,व किरंगीसर्रा गाव चे राजु धुर्वे , रेखा अनिल कोडवते ग्रा पं सदस्य यांचे कडुन निवेदन देण्यात आले व गावाना कॉरोसिन चा पुरवठा करण्याची मागणी केली व भाजपा युवा मोर्चा र्तर्फ विद्युत अभियंता यांना निवेदन देऊन त्वरित दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा भाजयुमो आंदोलन करण्यास बाध्य राहील व त्याची संपूर्ण जवाबदारी विद्युत मंडळाची राहील असा सूचक इशारा देण्यात आला..
निवेदन देताना भाजयुमो पारशिवनी तालुका अध्यक्ष प्रतीक वैद्य,भाजयुमो महामंत्री व पं.स. सदस्य नरेश मेश्राम,कायदा सेल तलुका महामंत्री अँड. भूषण कुथे, सांस्कृतिक सेल तालुका महामंत्री तुळशीदासजी प्रधान,कमलेश सहारे उपस्थित होते. गट ग्राम पंचायत कोलितमारा क्षेत्रात असलेला किरंगी सर्रा गावातिल विद्युत प्रवाह महापुरा ने खांब वाहुन गेल्याने खंडित झाला आहे ,ग्राम पंचायत चे सरपंच कालिराम उके, उपसरपंच, व किरंगी सर्रा चे ग्राम पंचायत सदस्य राजु धुर्वे, व रेखा अनिल कोड़वते यांनी ग्रा पं मार्फत उपविभागिय आधिकारी रामटेक,व तहासेलदार पारशित्वनी याना प्रत्र देऊन किरंगी सर्रा गावी विद्युत प्रवाह बंद असल्याने कॉरोसिन चे वाटप करण्याची मागणी केत्नी होती पण आज पर्यत शासीकय मदत मिळाली नाही , गुरुवार ला विघुत विभागाचे कार्यकारी आभियंता व नवेगाव खेरी चे कनिष्ठ आभियंता व कर्मचारी सह चोकशी कारिता गावात आले पण त्याचे नुसार जो पर्यत नदीत पाणी कमी होत नाही तो पर्यत विद्युत खंडित रहील् असे म्हटले गेलो ,सरपंच कालीराम उपसरपंच ,किरंगी सर्रा चे ग़ा पं सदस्य राजु धुर्वे व रेखा अनिल कोड़वते यांनी पुन्हा तहासिलादार याना पत्र देऊन गावात कॅरोसिन पुरवठा ची मगाणी केली