सर्व पक्षीय ठिय्या आंदोलनाला यश नगरध्यक्षा 2 डिसेंबरला विशेष सभा घेणार
कन्हान,ता.३० नोव्हेंबर
सर्व पक्षीय कन्हान शहरवाशी व सामाजीक कार्यकत्यांच्या व व्यापारी संघ यांच्या पुढाकाराने बुधवार (ता.३०) नोव्हेंबर रोजी कन्हान नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
हिंदूस्थान लिव्हर लि.कंपनी ची १८.५ एकर जागा ग्रोमर वेंचर द्वारे खरेदी करण्यात आली होती. कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गर्जा पूर्ण करण्यासाठी भुखंडाची आवश्यक आहे. या मागणी करीता कन्हान परीसरातील विविध राजकीय पक्षाने वारंवार निवेदन देऊन नगर परिषदेला विशेष सभा घेण्याचे व ठराव पारीत करण्याचे विनंती करण्यात आली होती. परंतु नगर परिषदेने या विषयावर विशेष सभा घेतली नाही, किंबहुना नगरपरिषदेच्या मागणी करुणही विशेष सभा बोलवीण्यात आली नाही. नगरपरिषदेच्या सदस्यांनी माजी आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा नेतृत्वात जिल्हा अधिकारी नागपुर यांच्या कड़े विशेष सभा बोलावण्यासाठी निवेदन सादर केले. यावेळी योगेंद्र रंगारी उपाध्यक्ष न.प., सौ.सुषमा चोपकर, राजेन्द्र शेंद्रे गटनेते, सौ.अनिता पाटिल, राजेश यादव, श्रीमती. कल्पना नितनवरे, विनय यादव, सौ.गुम्फा तिड़के, मनीष भिवगड़े, श्रीमती.पुष्पा कावड़कर, सौ.संगीता खोब्रागडे, सौ.वंदना कुरडकर, कु.रेखा टोहने, सौ.वर्षा लोंढे, सौ. मोनीका पौनिकर, डायनल शेंडे उपस्थित होते.
यानंतर दुपारी 12.00 वाजता कन्हान नगर परिषदेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष सौ.करुणाताई आष्टणकर यांना विशेष सभा घेण्यास बाध्य करण्यात आले. या ठिय्या आंदोलनात स्व:ता नगराध्यक्षा सौ.करुणाताई आष्टणकर व मुख्याधिकारी यांनी (ता.02) डींसेबर रोजी विशेष सभा घेण्यात येईल असे जाहिर केले. या विशेष सभेच्या ठरावा द्वारे हिंदूस्तान लिव्हरची कंपनीची संपूर्ण जागा कन्हान नगराच्या सार्वजनिक मुलभुत विकासासाठी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव पारित करण्याचे मान्य केले.
तसेच ता.24/11/22 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन प्रस्ताव कन्हान विकास आरखडा रद्द करण्याचे मान्य केले. कन्हान नगराचा विकास आरखडा हिंदूस्तान लिव्हर लि. च्या संपूर्ण 18.5 एकर जागेवर प्रस्तावित करण्याचे मान्य केले. निवेदन करत्या सर्व नगर परिषद सदस्यांनी एक मताने ठराव पारित करण्याचे मान्य केले. ठिय्या आंदोलना मध्ये स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सर्व पक्षीय नेते नरेश बर्वे, राजेश यादव, योगेश वाड़ीभस्में, उदयसिंह यादव, रमेश कारेमोरे, विजय हटवार, महेंद्र भूरे, अकरम कुरेशी, विनोद किरपान, सतीस भसारकर, चिंटू वाकुळकर, ज्ञानेश्वर दारोडे, अखिलेश मेश्राम, कामेश्वर शर्मा, अभिजीत चांदुकर, विक्की जीभकाटे, मो.सफीक शेख, फिरोज शेख, सौ.आशाताई पनिकर, सौ.पुर्णिमा दुबे, हर्षाली नागपुरे, मिनाताई कलम्बे, प्रतिक्षाताई चवरे, प्रशिक सुखदेवे, रवि महाकाळकर, शैलेश कड़बे, प्रशिक सुखदेव, मयुर माटे, सुरेश कडम्बे, सचिन वासनिक, शरद वाटकर, अजय लोंढे, मनोज कुरडकर, दीपंकर गजभिये, छोटू राणे, अजय चव्हाण व इतर गावांतील नागरिक व सामाजिक कार्यकते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या ठीय्या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी लिलाधर बर्वे, रिंकेश चवरे, शैलेश शेळके, राजेश पोटभरे, विक्की जीभकाटे, सुरेंद्र चवरे, नीलकंठ मस्के यांनी अधक परीश्रम घेतले.
Post Views: 352