तालुकात १० ग्राम पंचायतीतुन ८५ नामांकन भरले,काल ७२ लोकांनी आवेदन अर्ज दाखल केले

*तालुकात १० ग्राम पंचायतीतुन ८५ नामांकन भरले,काल ७२ लोकांनी आवेदन अर्ज दाखल केले*
*आज अर्ज करण्याचे शेवट चा दिवस*

कमलासिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी


*पाराशिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२ मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ ग्राम पंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. यासाठी ग्रा. पं. क्षेत्रातील हौशी मंडळी आपले नशीब अजमावणार आहेत. परंतु, नामांकन अर्ज दाखल करण्याच्या आज च्या दिवशी ७२ नामांकन पत्र दाखल झालेले असल्यामुळे एकुण८५ आवेदन अर्ज दाखल झाले आहे,
याआधी जनतेतून सरपंच निवडण्याची प्रक्रिया होती. मताची मदत व्हावी म्हणून पॅनल उभे करण्याची आवश्यकता सरपंचपदाच्या उमेदवारांना वाटायची. सदस्यांमधून सरपंच निवडीची प्रक्रिया होत असल्याने पद पदरात पाडून घेण्यासाठी ऐन तेन प्रकारे आटापिटा करीत सदस्य निवडून आणण्याची जबाबदारी सरपंच पदाचे उमेदवार घेत होते.

   सन २0२0 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य निवडणूक झाल्यानंतर सरपंचांचे आरक्षण जाहीर होईल. त्यामुळे सदस्य निवडणुकीत उतरविण्यास कोणी पुढे धजत नाही. मात्र, ८ डिसेंबरला सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यानुसार संभाव्य उमेदवारांनी जय्यत तयारी केली होती. विधानमंडळाच्या अधिवेशनात सरपंच पदाचे आरक्षण हे सदस्य निवडीनंतर करावे, असे ठरल्याने अनेकांचा हिरमोड झाला. त्यामुळेच की काय ग्रा. पं. निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्याआज च्या दिवशी पर्यत एकुण ८५ अर्ज नामांकन पत्र दाखल झालेले आहे आज मंगलवारी ७३ नामांकन जमा केले
 ईटगाव येथुन १४ नामांकन,
पिपळा ११ नामांकन
निमखेडा १० नामांकन
बोरी(सिगारीदप) ८ नामांकन
सुवरधरा येथुन ७ ,
आमगाव ३ ,नवेगाव खैरी ११ , खंडाळा घटाटे ६ ,खेडी ७ ,माहुली ८ नामाकन असे एकुण ८५ नामाकन अर्ज दाखल केले ,आता फक्त आज शेवट च्या दिवस दि. ३0 डिसेंबरपर्यंतच नामांकनपत्र दाखल करावयाचे असल्याने इच्छुक उमेदवारांना बराच त्रास सहन करावा लागणार आहे. कारण कधी नेटवर्क तर कधी विजेचा फटका बसू शकतो. त्यातच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने पॅनल कोण लढविणार, किती व कोण पैसे खर्च करणार? असा प्रश्न गावपुढार्‍यांच्या चर्चेतून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आपला सोनु गणेशजी रावसाहेब

Wed Dec 30 , 2020
                     🙏   सप्रेम नमस्कार  🙏 प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो,       मी  सोनु  रावसाहेब आज ग्राम पंचायत जटामखोरा वॉर्ड क्रमांक-1 करिता निवडणूक अर्ज तहसील कार्यालय सावनेर येथे दाखल करणार आहे, तरीही आपणास विनंती आहे की माझे प्रोत्साहन वाढविण्याकरिता तसेच […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta