*अर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार*
तालुका निवडणुक सहारे
कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रातिनिधी
, *पाराशिवनी* (ता प्र:) :– ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपरिक पध्दतीने (Offline Mode) स्वीकारण्याचा तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ ही आज ३० डिसेंबर, 2020 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. अशी माहिती तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार वरूण कुमार सहारे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावाधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जिल्ह्यातील १३०,यात तालुकाची १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशन दाखल करण्यास 23 डिसेंबर, 2020 पासून सुरवात झाली. 30 डिसेंबर, 2020 अशी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.
या कालावधीत संगणक प्रणालीत तालुकातुन 84 एवढे नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. मात्र, नामनिर्देशन पत्र दाखल करताना . या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला आहे.तालुकातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन निवडणुक तहसिलदार श्री. वरूण सहारे यांनी केले आहे.