निवडणूकीत राष्ट्रीय कर्तव्य बजावणारे शिक्षकच उपेक्षित ; निवडणूक कर्तव्यावर असणा-या शिक्षकांना भत्त्यापासून ठेवले वंचीत

*निवडणूकीत राष्ट्रीय कर्तव्य बजावणारे शिक्षकच उपेक्षित*

*निवडणूक कर्तव्यावर असणा-या शिक्षकांना भत्त्यापासून ठेवले वंचीत*

*कन्हान*:गेल्या वर्षभरात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका राष्ट्रीय कर्तव्य समजून सुरळीतपणे पारणा-या शिक्षकांनाच मात्र नियमानुसार देय निवडणूक भत्यापासून वंचीत ठेवण्यात आले त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे.या संदर्भात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांचे नेतृत्वात उपजिल्हाधिकारी(निवडणूक) मिनल कळसकर यांना निवेदन देऊन प्रलंबीत निवडणूक भत्त्यासंदर्भात चर्चा केली.


सन 2018 च्या ग्रामपंचायत निवडणूका त्यानंतर १५जानेवारी २०२१ ला पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका,तद्नंतर ५ ऑक्टोबर २०२१ ला झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या पोटनिवडणुका व नुकत्याच २१ ऑक्टोबर २०२१ रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुका शिक्षकांची सेवा अधिग्रहीत करून प्रशासनाने आटोपल्या परंतू यात प्रामाणिक पणे कर्तव्य बजावणा-या शिक्षकांनाच मात्र नियमानुसार देय निवडणूक भत्त्यापासून वंचीत ठेवण्यात आले.
शिक्षकांकडून बँक खाते क्रमांक मागवून आशेवर ठेवण्यात आले परंतू आजपर्यंत रुपयाही खात्यात जमा करण्यात आला नाही.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या १८ मार्च २०१४ च्या शासन निर्णयानुसार निवडणूक कर्तव्यावर नेमून दिलेल्या ठिकाणी निवासी राहावे लागत असल्यामुळे दोन दिवसाचा भोजन भत्ता तसेच तालुक्याच्या ठिकाणी दोन दिवसाचे प्रशिक्षण व प्रत्यक्ष निवडणूक यासाठीचा प्रवासभत्ता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना अनुक्रमे एकत्रीत १७०० व १३०० रूपये देय ठरतो परंतू लोकसभा व विधानसभा निवडणुक वगळता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत शिक्षकांना राबवून घेतले जाते परंतू निवडणुक भत्त्यापासून वंचीत ठेवण्यात येते.यासंदर्भात उपजिल्हाधिकारी(निवडणूक) यांचेशी चर्चा करून प्रलंबित निवडणूक भत्त्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त चिटणीस सुनिल पेटकर,जिल्हाध्यक्ष धनराज बोडे,आनंद गिरडकर अशोक बावनकुळे,गजेंद्र कोल्हे,विरेंद्र वाघमारे,उमेश आष्टनकर,उज्वल रोकडे,विजय बिडवाईक,अभिमन्यू वंजारी, महिपाल बनगैया,हरिश्चंद्र रेवतकर,महेश राकेश, आशा झिल्पे,सिंधु टिपरे,शालीनी लोही,किशोर रोगे,अर्जुन धांडे,अनिल पाटील,तुषार चरडे,जगदीश पिट्टुले,अरविंद लोही,रामेश्वर थोटे,नागेश बोगाडे,ओमप्रकाश कामडे,सयाजी जिभकाटे,अनिल गडपायले,संतोष दोहतरे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह

Fri Dec 31 , 2021
कन्हान चा ६ महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह कन्हान : – शिवनगर कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर च्या खाजगी रूग्णलयात उपचार सुरू आहे. गुरूवार (दि.३०) डिसेंबर ला शिवनगर तारसा रोड कन्हान येथील सहा महिन्याचे बाळ कोरोना पॉझीटिव्ह आल्याने नागपुर येथील  खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याच्या घरच्यांची […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta