काँग्रेस कमेटी कन्हान व्दारे मोदी सरकारच्या ७ वर्षीय अपयशी कारभाराचा निषेध
#) महागाई व दरवाढ कमी करण्याची मागणी.
कन्हान : – केंद्रात असलेल्या भाजपा सरकार च्या ७ वर्षाच्या अपयशी कारभारावर नाराजी व्यक्त करित कॉग्रेस कमेटी कन्हान व्दारे आबेंडकर चौक येथे काळी फित लावुन काळे झेंडे दाखवित मोदी सरकार चा निषेध नोंदवत धरणे आंदोलन करून महागाई व दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली.
रविवार (दि.३०) मे २०२१ ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. नाना पटोले आणि नागपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष मा. श्री राजेंद्र मुळक यांच्या सुचनेनुसार कॉग्रेस कमेटी कन्हान डॉ बाबासा हेब आंबेडकर चौक येथे काँग्रेस कमेटी कन्हान अध्य क्ष राजेश यादव यांच्या नेतृत्वात मोदी सरकार केंद्रात ७ वर्ष सत्तेत राहुन ही कोरोना रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा तसेच पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई, नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी बिल, कोरोना महामारी व्यवस्थापनात आलेले अपयशा च्या निषेधा त कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यानी काळ्या फिता बांधुन काळे झेंडे दाखवुन निषेध आंदोलन करून मोदी सरकार विरोधात नारेबाजी करित महागाई व दरवाढ कमी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी कॉग्रेस कमेटी कन्हान अध्यक्ष राजेश यादव, डॉ प्रकाश बोन्द्रे, श्यामजी पिपलवा, गणेश माहोरे, नगरसेविका कल्पना नितनवरे, रेखाताई टोहणे, प्रमोद बांते, रविभाऊ रंग, पंकज गजभिये, पवन यादव, अविनाश रायपुरे, सुधाकर शंभरकर, देवाशु मेश्राम, अभिषेक यादव, अनुज चौरे, तुषार झुले सहीत काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.