कोठेकर कुटुंबाला नोकरी व भरपाई देऊन न्याय देण्याची मागणी
शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन
कन्हान,ता.३१
वेकोलि कोळसा खदान च्या ब्लास्टिंगमुळे एक घर कोसळल्याने सहा वर्षाची मुलगी कु.यादवी आणि कमलेश कोठेकर या बापलेकीचा मलब्यात दबुन दुर्देवी मृत्यु झाला. ही घटना सोमवार रोजी दुपारी हरीहर नगर कांद्री येथे घडल्याने वेकोली व्दारे मृतकाच्या पत्नीला नोकरी व भरपाई देऊन परिवारास योग्य न्याय देण्याची मागणी नीतिन गडकरी याना निवेदन देऊन करण्यात आली.
कोळसा उत्खनना करिता मागिल भरपुर महिन्या पासुन वेकोलि अधिकारी बेजबावदारपणे मनमानी कारभार करित कोळसा मिश्रीत माती डंम्पिंग कन्हान शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात करून उंचच उंच कृत्रिम टेकडया निर्माण करित आहे. या कोळसा मिश्रीत मातीचे धुळ प्रदुर्शनाने कन्हान शहर आणि ग्रामिण भागाच्या परिसरातील नागरिकांना आरोग्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे. माती व कोळसा उत्खनना करिता करण्यात येणाऱ्या मोठया प्रमाणात बारूद ब्लास्टिंगमुळे लोकांच्या घराना हादरे बसुन घरास भेगा पडुन घराचे मोठे नुकसान होत आहे. याविषयी विविध संघटना द्वारे अनेकदा तक्रार नोंदविल्यावर ही वेकोलि कामठी खुली खदान च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करित आहे. रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल यांना हा गंभीर विषय माहिती असल्यावर ही दुर्लक्ष करित असल्याने सोमवार (दि.२८) ऑगस्ट ला दुपारी हरीहर नगर कांद्री येथे कमलेश गजानन कोठेकर यांचे घर खदानच्या ब्लॉस्टींग मुळे कोसळल्याने कमलेश कोटेकर व सहा वर्षाची मुलगी कु.यादवी कोठेकर या दोन्ही बापलेकीचा घराच्या मलब्यात दबुन दुर्देवी मृत्यु झाला.
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने योगेश वाडीभस्मे यांचा नेतृत्वात शिष्ठमंडळाने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन गंभीर विषयी आणि घटनेवर चर्चा करुन मृतकाच्या परिवाराच्या उदरनिर्वाह करिता पत्नी उषा कोठेकर हिला नोकरी आणि मोबदला देऊन परिवाराला योग्य न्याय मिळवुन देण्याची मागणी केली. नितिन गडकरी यांनी सीएमडी यांना लवकरात लवकर योग्य कार्यवाहीचे आदेश दिले आहे. याप्रसंगी योगेश वाडिभस्मे, गुरुदेव चकोले, रिंकेश चवरे, उमेश कुंभलकर, योगेश रंगारी, शुखांशु मेहरकुळे, गौरव कावळे, शांतनु चकोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 732
Thu Aug 31 , 2023
केरडी येथे गुरू, शिष्य स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न कन्हान,ता. ३१ आनंदी सांस्कृतिक लोककला मंडळ केरडी व गुरु भारती तुर्रा पार्टी गायन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुशिष्य स्नेहमिलन आणि शाहीर लोक कलावंताचा मेळावा केरडी येथे थाटात पार पडला. आनंदी सांस्कृतिक लोककला मंडळ केरडी व […]