केरडी येथे गुरू, शिष्य स्नेहमिलन सोहळा थाटात संपन्न
कन्हान,ता. ३१
आनंदी सांस्कृतिक लोककला मंडळ केरडी व गुरु भारती तुर्रा पार्टी गायन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुशिष्य स्नेहमिलन आणि शाहीर लोक कलावंताचा मेळावा केरडी येथे थाटात पार पडला.
आनंदी सांस्कृतिक लोककला मंडळ केरडी व गुरु भारती तुर्रा पार्टी गायन मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुशिष्य स्नेहमिलन आणि शाहीर लोक कलावंत मेळाव्याचे आयोजन गुरु भारती तुर्रा पार्टी गायन मंडळाचे शाहीर भगवान भाऊ वानखेडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे कवडु वानखेडे माजी सरपंच केरडी यांचे हस्ते उद्घाटन करून शाहीर कलावंत शिष्यानी गुरू चे पुजन, नमन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी कैलास खंडाळ शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख पारशिवनी, सौ.रत्नमाला वानखेडे सरपंच व सर्व ग्राम पंचायत सदस्य केरडी, कवी गुरुवर्य वस्ताद नागोराव धवस संगम खैरीवाले, गुरु भारतीचे मार्गदर्शक शाहीर अशोक खाडे झिंगाबाई टाकळी, कवी गुरुवर्य सुर्यभान शेंडे, भारतीय कलाकार शाहीर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष व मानधन समिती सदस्य शाहीर राजेंद्र बावनकुळे, देवाजी भोयर माजी पोलीस पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
शाहीर भगवान भाऊ वानखेडे यांनी गण गौळण गायन करून गुरू, शिष्य स्नेहमिलन कार्यक्रमाची सुरूवात करून मान्यवरांचे स्वागत, सत्कार करून ग्रामिण लोक कलावंतानी आपल्या कला सादर करित मनोरंजत्माक जन जागृती पर समाज प्रबोधन केले.
याप्रसंगी शाहीर विजय चावके, प्रदीप चंदनबावने, शांताराम शिंदुरकर, लिलाधर भांगे, मारोती मारबते, विनायक विरुटकर, शाहीर सचिन कडु, पुरुषोत्त ठाकरे, चंदभान वानखेडे, अन्नाजी ठाकरे, रामभाऊ हिवसे, जनार्दन पांडे, पांडुरंग काठोके , शाहीर गुणवंता डेंगे, आनंदराव शहारे निरव्हा, दत्तुजी हिवसे, राजु वानखेडे, ज्ञानेश्वर ठाकरे, वसंता खंडार, वामण भडंग, रामचंद्र काठोके, ईश्वर भोयर, चिंधबाजी खंडार, हरीचंद वानखेडे, बेबीबाई ब्राम्हणे ग्रा पं सदस्य केरडी, अश्विनीताई खंडार, सर्व भजन मंडळ केरडी सह ग्रामिण लोक कलावंतानी बहु संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रम थाटात साजरा केला.
Post Views: 690
Thu Aug 31 , 2023
विद्यार्थींनी पोलीस जवानांना, वृक्षाला राखी बांधुन सण साजरा कन्हान,ता. ३१ आर्दश हायस्कुल, कन्हान शाळेच्या विद्यार्थींनी पोलीस निरिक्षक, जवानांना आणि वृक्षाला राखी बांधुन रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात थाटात पार पाडला. श्रावण पौर्णिमा दिवशी दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधण’ सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे […]