विद्यार्थींनी पोलीस जवानांना, वृक्षाला राखी बांधुन सण साजरा
कन्हान,ता. ३१
आर्दश हायस्कुल, कन्हान शाळेच्या विद्यार्थींनी पोलीस निरिक्षक, जवानांना आणि वृक्षाला राखी बांधुन रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात थाटात पार पाडला.
श्रावण पौर्णिमा दिवशी दरवर्षी रक्षाबंधनचा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये ‘रक्षाबंधण’ सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.देशभरात या सणाचे महत्त्व प्राप्त असून वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा, तर पश्चिम भारतातात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने सण साजरा केला जातो.
रक्षाबंधन महोत्सव निमित्य आर्दश हायस्कुल व आयडियल काॅ.हि.प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन पोलीस स्टेशन येथे करण्यात आले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थींनी पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यशवंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझले, राजेश जोशी सह अधिकार्यांना , कर्मचाऱ्यांना राखी बांधली. पर्यावरणा च्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेण्यासाठी झाडाला राखी बांधली. ठाणेदार सार्थक नेहेते यांनी विद्यार्थींना विविध विषयावर मार्गदर्शन करुन रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा च्या शुभेच्छा देऊन रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. प्रसंगी विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, शिक्षक गण, परिसरातील सुज्ञ नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते .
Post Views: 734
Tue Sep 12 , 2023
*घाटंजी येथे बंजारा समाजाचा तीज विसर्जन सोहळा उत्साहात साजरा* घाटंजी : श्री संत सेवालाल महाराज तांड्याचा तीज विसर्जन सोहळा जल्लोशात पार पडला. बंजारा समाजाच्या परंमपरे नुसार संत सेवालाल महाराज मंदिर येथे तांड्याचे नायक नामदेवराव आडे, कारभारी अरविंद जाधव, डाव बंडू जाधव व तांड्यातील मान्यवरांच्या उपस्थितित रक्षाबंधनच्या शुभ पर्वावर तीज पेरण्यात […]