तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण
कन्हान : – शहरातील नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर महिन्यात सुजाता बुद्ध विहारात थाईलैंड वरून तथागत गौतम बुद्धांची मुर्ती आणण्यात आली असुन त्या मुर्तीचा अनवारण सोहळा शुक्रवार ला पार पाडण्यात आला.
सुजाता बुद्ध विहार नाका नंबर सात येथे मागच्या डिसेंबर महिन्यात थाईलैंड येथुन तथागत गौतम बुद्धां ची मुर्ती आणण्यात आली होती. कन्हान-पिपरी नगर परिषदेची निवडणुक व मार्च महिन्या पासुन देशात को विड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लावलेलेली टाळे बंदी आणि संचारबंदीमुळे मुर्ती अनावरण सोहळा थांबला होता.
शुक्रवार (दि.३०) ला सायंकाळी ५ वाजता सुजाता
तथागत गौतम बुद्धांच्या मुर्ती चे अनावरण
विहारात भंते आर्य नागाअर्जुन सुरई ससाई, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते तथागतांची यगत गौतम बुद्धांच्या मुर्तीचे अनवारण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष शंकर चाहांदे, माजी सरपंच दौलतराव ढोके, विनायक वाघधरे, भगवान नितनवरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन सुजाता बुद्ध विहार महिला मंडळांनी करून कार्यक्रम यशस्विते करिता भाजपा तालुका महामंत्री संजय रंगारी, दिप नकर गजभिये, धम्मा ऊके, चंपाबाई गजभिये, प्रतिभा रंगारी, शालु बेलेकर, बेबीबाई वासनिक, मालन ढोके, पौर्णिमा नंदेश्वर, सत्यभाग डहारे, अर्चना ऊके, काजल नागदेवे आदीनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनिल लाडेकर यांनी तर आभार बाळु नागदेवे यांनी मानले. कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अतुल हजारे, नगरपरिषद विरोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे, नगरसेविका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटील, लक्ष्मी लाडेकर, राखी परते, शालिनी बर्वे, रिंकेश चवरे, शैलेश शेळकी, धर्मेंद्र गणवीर, मयुर माटे, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, प्रदीप बावने, अखिलेश मेश्राम, हरीओम प्रकाश नारायण, ओम कुंभलकर,जाॅकी मानकर, शाहरुख खान,नितिन मेश्राम, सोनु खोब्रागडे सह नागरिक उपस्थित होते.