साटक ला २० रक्तदात्याने केले रक्तदान
कन्हान : – ग्राम पंचायत साटक, प्राथमिक आरोग्य केंद्र, अपोलो क्लासेस व कॅरियर अकॅडेमी साटक- नगरधन व आकाशझेप फाऊंडेशन रामटेक यांच्या सयुक्त विद्यमाने साटक येथे आयोजित रक्तदान शिबी रात २० रक्तदात्याने रक्तदान करून दिला मानवतेचा संदेश.
” देऊ मनुष्याला जिवाचे दान, चला करूया महा रक्तदान. ” गुरूवार (दि.२४) डिसेंबर २०२० ला सका ळी १० ते २ वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र साटक येथे आयोजित शिबीरांचे ग्रा प साटक सरपंचा सिमा ताई यशवंतराव उकुंडे यांच्या हस्ते व सदस्य तरुण बर्वे, दिपक मोहनकर, ग्रामसेवक शेळके व सोनवणे, साक्षोधन कडबे, शैलेश वाढई यांच्या प्रमुख उपस्थिती त सुरूवात करण्यात आली आहे. शिबीरातील संकलि त रक्त हे सुपर स्पेलालिटी रूग्णालयातील जनसामान्य गरजु रूग्णांच्या नि:शुल्क सेवेसाठी वापरले जाणार असल्याने रमाकांत मुरमुरे, यशवंत उकुंडे, सुरेंद्र मोहन कर, आशिष राऊत, आशिष देशमुख, कमलाकर गुडधे , नितेश कुंभलकर, अजय हिंगणकर, मुर्ती कट्टीपुडी, महादेव देशमुख, विजय भुते, संदीप गरवाल, शंकर डडुरे, आशिष डोकरीमारे, कैलास डवरे, प्रमोद मोहन कर यांचेसह २० तरुणांनी रक्तदानातून मानवतेचा संदे श दिला. सुपर स्पेशालिटी शासकीय रुग्णालय नागपूुर येथील बीटीओ डॉ. मुकेश वाघमारे, संदीप महाकाळ कर, समाजसेवा अधिक्षक रूचिका बिरे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ वेणू तुरनकर, अधिपरिचारीका वैष्णवी राउत, अशोक गिरडे, राजु उप्पलवार यांनी उत्तमरित्या रक्त संकलन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथ. आरोग्य केंद्र साटक वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली हिंगे, मंगेश, कल्पना, पुनम चोपकर, राजु तांबे, श्याम राहाटे व अपोलो क्लासेस, ग्रामपंचायत कर्मचारी व गावकऱ्यांनी सहकार्य केले. आम्ही भारतीय अभिया नाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी आयोज क व रक्तदात्यांचे आभार मानले.