भालेराव हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
सावनेर तालुका प्रतिनिधी : मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या स्थानिक भालेराव हायस्कूल येथे व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते सहाव्या वर्गातील वेगवेगळ्या तुकडीतील 105 मुले व मुली यांना नोटबुक यांचे वाटप आज शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. विद्यार्थ्यांना नोटबुक आपणास मिळत असल्याचे ऐकून सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक चिमुकल्यांचे चेहरेसुद्धा फुलू लागायला लागले होते. शाळेमध्ये गरीब विद्यार्थ्यांकडे पुस्तके तसेच नोटबुक नाही आहेत याची माहिती अतुल पाटील यांना मिळाली. त्यांनी मुख्याध्यापिका माया रामटेके व उपमुख्यध्यापिका भारती लोणकर यांच्याशी संपर्क साधून गोरगरीब विद्यार्थ्यांना नोटबुक देण्याची विनंती केली ती विनंती मान्य करून आज पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी शाळेचे सुपरवायझर ज्ञानेश्वर जाधव शिक्षक अमोल सुके, आलोक महाजन, तिवारी मॅडम, आवळे मॅडम, व इतर शिक्षक गण उपस्थित होते. नोटबुक वाटप केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर शिक्षक गणांनी अतुल पाटील यांचे आभार मानले.