दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक 

 दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

  1. दोन आरोपी सहीत चार दुचाकी वाहन ताब्यात

कन्हान : – पोलीस स्टेशन हददीत सात किमी अंतरावरील वराडा रहिवासी सुरज तांदुळकर यांची दुचाकी वाहन किंमत ५०,००० रूपये अज्ञात चोरट याने चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र ३३३/२२ कलम ३७९ भांदवि अन्वये गुन्हा दाखल असल्याने आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त खात्रीशीर माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चनकापुर क्वार्टर खापरखेड़ा येथे धाड मारून दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्या जवळुन चार दुचाकी वाहनासह एकुण १,२५, ००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
नागपुर ग्रामिण जिल्हयात मोटर सायकल चोरी चे प्रमाण दिवसे दिवस वाढत असल्याने नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक मा. विजयकुमार मगर यांनी सदर घटनेवर आळा घालण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांना आदेश दिल्याने पो नि ओमप्रकाश कोकाटे यांनी ही बाब अत्यंत गांभिर्याने घेवुन आपले अधिनस्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना आदेशित करून पथके तयार केली. गुरूवार (दि.१४) जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिणचे पथक कन्हान उपविभागात पेट्रोलींग करीत असता गुप्त माहीती दाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन खापरखेडा व नागपुर ग्रामिण हद्दीतुन चोरी केलेल्या दुचाकी आरोपी रोहीत वर्मा व त्याचा साथी दार आरोपी इशाक खान यानी चोरून आरोपी रोहीत वर्मा राहत असलेल्या चनकापुर येथील त्याचे घराचे आवारात ठेवलेल्या असुन त्या दुचाकी वाहन ते विकण्याचे तयारीत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चनकापुर वेकोलि क्वॉर्टर कं ४२/३ खापरखेड़ा येथे धाड टाकली असता आरोपी १) रोहीत रामनरेश वर्मा (२१) रा. पाताखेडा ता घोडाडोगंरी जि. बैतुल यांच्या क्वॉर्टर चे मागे असलेल्या रूमची पाहणी केली असता त्याचे पडीत रूममध्ये चार वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर साय कल दिसुन आल्या. आरोपी रोहित वर्मा ने सदर मोटर सायकल त्याचा मित्र आरोपी २) इशाक खान रा. गोदिंया याचे सह मिळुन चोरी केल्याचे कबुल केले. आरोपी इशाक फिरोज खान (२१) फुलचुर पेठ आयटीआय गोदिंया यास ताब्यात घेण्यात आले असता त्याने सुध्दा आरोपी रोहीत वर्मा सोबत सदर च्या मोटरसायकल चोरी केल्याचे सांगीतले. सदर कार वाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी १) रोहित वर्मा, २) इशाक फिरोज खान यांना अटक करून त्यांच्या ताब्यातुन काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, बिना क्रमांकाची, चेसिस क्र. एमबीएल एचएडब्लु ११३१५१०२२५२ किंमत ५०,००० रूपये सह एकुण ४ मोटर सायकल असे एकुण किंमत १,२५, ००० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विजयकुमा र मगर, अपर पोलिस अधीक्षक राहुल माखणीकर यांच्या मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सपोनि अनिल राऊत, पोह वा ज्ञानेश्वर राऊत, विनोद काळे, अरविंद भगत, प़ोना शैलेश यादव, विरेंद्र नरड, प्रणय बनाफर, रोहन डाखोरे , चालक सफौ साहेबराव बहाळे यांच्या पथकाने ही कार्यवाही यशस्विरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुरुपौर्णिमा निमित्य गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा

Sat Jul 16 , 2022
 गुरुपौर्णिमा निमित्य गुरूपुजा कार्यक्रम थाटात साजरा कन्हान : – परिसरातील कन्हान, कांद्री आणि टेकाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करून भजन, किर्तन, पुजा अर्चना करून मान्यवरांचा सत्कार व खीर वितरणासह विविध कार्यक्रमाने गुरू पुजा थाटात साजरा करण्यात आला. कांद्री येथे डहाका मंडळा व्दारे गुरूपुजा थाटात साजरी शिवशक्ती डहाका मंडळ […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta