चौघांनी युवकाला चोप देत मोबाईल व खिश्यातील १४००० रू हिसकावले
तिन आरोपी स्वत: सरेंडर तर एक आरोपी अद्याप फरार.
कन्हान,ता.06 ऑगस्ट
पोलीस स्टेशन हददीत असलेल्या राजीक पान पॅलेस दुकाना समोर चार युवकांनी शिवम पुरी च्या गालावर झापड मारून त्यास हाता- पायाने मारून त्याचा मोबाइल हिसकवुन त्याच्या खिशातुन १४,००० रूपये काढुन लुटमार केल्याने कन्हान पोलीसांनी युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहिती नुसार शुक्रवार (ता.५) ऑगस्ट रोजी शिवम पुरी याला रिज्वान अनवर खान वय १९ रा. पिपरी- कन्हान याने कामावर लावल्याने दु. १:३० वाजता शिवम बलीराम पुरी खर्रा घोटण्याचा कामा करिता जितु पान पॅलेस येथे गेला आणि तिथे रात्री १०:३० वाजता पर्यंत खर्रा घोटण्याचे काम आटोपुन घरी जाण्या निघाला. पान ठेल्यावर काम करणाऱ्या एका युवकाने शिवम पुरी यास आंबेडकर चौक येथे सोडले. तेथुन हा अशोक नगर मार्गाने घरी पायदळ जात असतांना राजीक पान पॅलेस दुकाना जवळ शुभम सलामे, अक्षय, तेनाली, प्रशांत या चार युवकांनी शिवम पुरी यास पकडुन शुभम सलामे याने शिवम ची काॅलर पकडुन त्याच्या गालावर झापड मारली असुन अक्षय, तेनाली, प्रशांत यांनी हाता पायाने मारले. शुभम सलामे ने शिवम च्या हातातुन मोबाइल हिसाकुन आपल्या जवळुन चाकु काढुन तेनाली जवळ देऊन शिवम ला धमकावुन जितु याने दिलेले १४,००० रूपये खिश्यातुन काढुन घेतले. शुभम सलामे व तिघांनी शिवम ला पकडुन ठेवले असता निक्कु अन्ना याला शुभम सलामे ने आपल्या मोबाइल ने फोन केला असता निक्कु अन्ना याने म्हटले, कि शिवम पुरी को छोड दो, उसका तुम्हारे झगडे में कोई हात नही है. असे म्हणुन निक्कु अन्ना ने फोन कट केला. युवकांने शिवम पुरी याला चाकु दाखवुन धमकावुन लुटमार केल्याने कन्हान पोलीसांनी शिवम पुरी याचा तोंडी तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला चारही युवकांन विरुद्ध कलम ३९२, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.
सदर प्रकरणात शुभम सलामे, तेनाली व प्रशांत हे तिघे शनिवार (ता.६) ऑगस्ट रोजी दुपारी कन्हान पोस्टे ला स्वतःच येऊन जमा (सरेंडर) झाले. तेनाली जवळ मोबाईल फोन मिळाला असुन मोबाइल ची सिम काढुन फेकला तर एक युवक अद्याप फरार
Post Views: 1,064
Sun Aug 7 , 2022
कन्हान मुख्य रस्त्यावरील ३,३०,३६४ रूपये होर्डिंग चोरी कन्हान,ता.06 ऑगस्ट पोलीस स्टेशन हददीत मुख्य रस्ता तारसा चौक, कन्हान येथील महाकाली कॉम्पलेक्सच्या वरचा बाजुला १५/२० फुट असे दोन जाहीरात फलक ( होर्डिंग ) लावण्यात आले होते. होर्डिंग करिता वापरण्यात आलेले लोंखडी एंगल, चँनल, नट बोल्ट असा एकुण ३,३०,३६४ रूपये चा मुद्देमाल चोरून […]