स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा
कन्हान, ता.15 ऑगस्ट
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराने साजरा १५ ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्य विदर्भ भुमिपुत्र संघटन व्दारे तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीरात ५९ रक्त दात्यांनी रक्तदान व ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.१५) ऑगस्ट २०२२ ला सकाळी १०.३० वाजता तारसा रोड चौक महाकाली कॉम्पलेक्स कन्हान येथे आयोजित भव्य रक्तदान व कोरोना बुस्टर डोज शिबीराचे विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान व्दारे आयोजन करून नगराध्यक्षा सौ. करूणाताई आष्टणकर यांचे हस्ते उद्घाटन करून सुरूवात करण्यात आली. शिबीरास इंदिरा गांधी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय रक्तपेढी नागपुर व प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान च्या डॉक्टर सह चंमुच्या सहकार्याने कन्हान परिसरातील ५९ रक्तदात्यानी रक्तदान केले तर १८ वर्षावरील ७३ नागरिकांनी बुस्टर डोज घेत लाभ घेऊन ७५ व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव थाटात साजरा करण्यात आला. तसेच तपस्या फाऊंडेशन रामटेक, एम.सी.एम. संविधानिक हक्क संघटन कन्हान, शिवराय ग्रुप खंडाळा यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीरास मा. प्रशांत सांगोडे तहसिलदार पारशिवनी सह रामटेक विधान सभा क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. भव्य रक्दान व बुस्टर डोज शिबीराचे आयोजक विदर्भ भुमिपुत्र संघटन कन्हान अध्यक्ष शिवशंकर (चिंटु) वाकुडकर यांनी तर संयोजक रजनीश मेश्राम, समशेर पुरवले, सुनिल लक्षणे, हरीश तिडके, भरत चकोले, राम भैया थदानी, दीपक कुंभल कर, प्रदीप गायकवाड, आशिष वानखेडे, मयुर माटे, कैलास भाऊ बिरो, सुकलाल यादव, सरिताताई बिरो, आशिष देशमुख, प्रमोद मोहतकर, राधेश्याम राऊत, श्रीकृष्ण माकडे, गुड्डा सूर्यवंशी, पवन ठाकुर, मंगेश धोटे आदी सह युवक, शहरवासीयांनी शिबीराच्या यशस्विते करिता परिश्रम घेतले.