नितीन गडकरी यांच्या हस्ते वच्छलागोपी पब्लिक स्कूलचे उद्घाटन
कन्हान, ता. 02 सप्टेंबर
वच्छलागोपी पब्लिक स्कूल क्रांन्दी-कन्हान येथील खाजगी शाळेचे उद्घाटन गुरूवार (ता.01) सप्टेंबर ला सांयकाळी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रीबीन कापून उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम थाटात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व महापुरुषाचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रसंगी माजी आमदार मा.डी.मल्लिकार्जुन रेड्डी, भाजपा जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये, जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्याताई गोतमारे उपस्थित होते. यावेळेस नितीन गडकरी बोलले की, लिलाधर बर्वे यांनी कन्हान, पारशीवनी आणी विशेष कोलमाईसचा क्षेत्रात उच्चशिक्षणाची या पब्लिक शाळेचा मार्फत चांगली व्यवस्था केली असुन डिजीटल अत्याधुनिक शिकवण्याची व्यवस्था आहे. यात प्रत्येक वर्गात एसी, डिजीटल स्क्रीन, आरोचे फिल्टर पाणी, ये-जा करण्यासाठी वॅन सुविधा तसेच शाळेला महाराष्ट्र सरकारने सरकार मान्यता दिलेली आहे. सोबत भारत सरकारचे नितीनीयम पुर्ण करेल. शाळकरी मुलांशी संवाद साधून त्यांना त्यांचा भविष्यासाठी अधिक चांगला अभ्यास करण्याचे समुपदेशन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राखी शाही उत्कृष्टरीतीने पार पाडले असुन प्रस्तावना सौ.शालीनी बर्वे यांनी केले तर आभार लीलाधर बर्वे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय गीताने करण्यात आली. यावेळेस शहर अध्यक्ष डॉ.मनोहर पाठक, रामभाऊ दिवटे, सुनिल लाडेकर, रीकेंश चवरे, शैलेश शेळके, नप गट नेता राजेंद्र शेंडे, न.प.नगरसेवीका सौ. सुषमा चोपकर, सौ.वर्षा लोंढे, सौ.वंदना कुरडकर, सौ. संगीता खोब्रागडे तसेच शीवाजी चकोले, गुरूदेव चकोले, नरेश पोटभरे, मयुर माटे, सचिन वासनिक आदी नागरीक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 967
Sat Sep 10 , 2022
* शिस्तबध्य “श्री” चे विसर्जन तिन दिवस शांतेत * विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरींग दोरजे यांची भेट * प्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करीत बाप्पाला निरोप कन्हान,ता.09 सप्टेंबर नदी काठावरील पुरातन काली माता मंदीर कन्हान घाटावर नदीच्या पुर परिस्थितीच्या पाश्वभुमीवर नगरपरिषद, पोलीस स्टेशन व ढिवर समाज सेवा संघटना व्दारे […]