“सूर नवा ध्यास नवा” सिझन 5 या संगीतमय रियालिटी शो मध्ये कन्हान चा उत्कर्ष वानखेडे ठरला विजेता

“सूर नवा ध्यास नवा” सिझन 5 या संगीतमय रियालिटी शो मध्ये कन्हान चा उत्कर्ष वानखेडे ठरला विजेता

नागपूर,ता.25 सप्टेंबर

     कलर्स मराठी वाहिनी वर यावर्षी “सूर नवा ध्यास नवा” या संगीतमय मालिकेचे सीझन 2 सुरू झाले. उत्कर्ष वानखेडेची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. दरम्यान या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करीत त्याने दोनदा “राजगायक” हा किताब मिळवला. संपूर्ण शोमध्ये स्वरांचे उत्तम सादरीकरण व गायनाची जादू दाखवल्याने अंतिम फेरीत त्याला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.

   कन्हान या ग्रामिण भागातून असलेला उत्कर्ष रविंद्र वानखेडे याने या आधी “सूर नवा ध्यास नवा” छोटे सुरवीर या प्रथम मालिकेत प्रवेश करीत अतिशय सुंदर व उत्कृष्ट गायनकलेचे सादरीकरण करीत त्याने टॉप 6 पर्यंत भरारी घेत संगीत क्षेत्रात ठसा उमटवला.
उत्कर्षला बालवयापासून घरातून आजोबां व वडिलांपासून संगीताचे संस्कार व बालकळू मिळाले. शालेय शिक्षण व संगीताचे शिक्षण घेत असतांना अवघे 10 वर्ष वयात त्याने सर्वप्रथम “द व्हॉईस किडस ” या एण्ड टीव्ही वरील स्पर्धेत सहभागी होत टॉप 20 पर्यंत मजल मारली.

  या स्पर्धेत, परीक्षक म्हणून हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिध्द गायक शान, संगीतकार शेखर, निती मोहन यांनी उत्कर्ष च्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर उत्कर्षणे कधीच मागे बघितलं नाही. एकामागे एक स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्यात असलेल्या कलेचा आविष्कार करीत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. वयाचे 12 वर्षी सारेगमप लिटिल चॅम्पस या झी.टीव्ही कृत गायन रियालिटी शोमध्ये सहभागी होत तो टॉप 6 च्या पंक्तीत जाऊन बसला. या शोमध्ये परीक्षक म्हणून असलेले गायक नेहा कक्कड, संगीतकार हिमेश रेशमिया, जावेद अली व श्रोत्यांनी अक्षरशः त्याच्या गायनाला दाद दिली. “म्युझिक की पाठशाळा व लव्ह मी इंडिया” या संगीतमय मालिकेत त्याने 10 एपिसोड पर्यंत उत्तम कामगिरी करीत आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनी वरील “सूर नवा ध्यास नवा” “छोटे सुरवीर” या संगीतमय रियालिटी शोमध्ये सहभागी होत फिनाले पर्यंत मजल गाठत टॉप 6 पोहचून स्वतःला सिध्द केले.


यावर्षी कलर्स मराठी वाहिनी निर्मित “सुर नवा ध्यास नवा” पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे या सिझन 5 या संगीत गीत गायन रियालिटी शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करीत अतिशय सुरेख, उत्तम व प्रतिभावंत गायन करीत स्पर्धेदरम्यान दोनदा राजगायक होण्याचा मान मिळवला. राजगायक म्हणून अँकर स्पृहा जोशी लिखित “श्रीमंत महाराष्ट्र” हे शीर्षक असलेले गाणे त्याच्या स्वतः च्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले. ते श्रोत्यांच्या पसंतीस उतरले आहे. त्यानंतर (दि. 25) सप्टेंबर ला मुंबईत झालेल्या ग्रँड फिनाले (महाअंतिम सोहळा) मध्ये 6 स्पर्धकांच्या समवेत अंत्यत चुरशी मध्ये अंत्यत लयबद्ध अप्रतिम सुरेल आवाजात शास्त्रीय संगीत च्या नियमाला धरून गाणी सादर करीत त्याने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. कलर्स मराठी वाहिनी तर्फे त्याला विजेता घोषित करून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रसिध्द संगीतकार “कल्याणजी-आनंदजी फेम” आनंदजी च्या हस्ते ” मानाची सुवर्ण कट्यार” देण्यात येऊन गौरविण्यात आले.
तसेच त्याला या स्पर्धेमध्ये प्रसिद्ध गायिका व संगीतकार वैशाली सामंत सोबत स्वतःचे आवाजात अल्बममध्ये व संगीतकार निषाद गोलंबरे यांचे सोबत अल्बममध्ये एक एक गाणे करण्याची संधी मिळाली. या माध्यमातून त्याला चित्रपटात दोन गाणे गाण्याची संधी प्राप्त झाली आहे.
या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे व प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. या संपूर्ण मालिकेचे संचालन चित्रपट अभिनेत्री स्पृहा जोशी हिने केले.
उत्कर्ष ने अंत्यत मेहनत व जिद्दीने, वयाच्या 17 वर्षी ही स्पर्धा जिंकून आपले व परिवाराचे, पर्यायाने आपल्या गावाचे नाव मोठे केले आहे. या विजयाने संपूर्ण कन्हान परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्कर्षच्या या यशाने संपुर्ण विदर्भ प्रांताचा नावलौकिक झाला असून उत्कर्ष वर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय त्याने आपले गुरू व वडील  रवींद्र सुधाकर वानखेडे व आई सौ.शरयू रवींद्र वानखेडे, आजोबा सुधाकरजी वानखेडे, आजी सौ.सुलोचना वानखेडे, काका आशिष वानखेडे, काकू-ज्ञानदेवी वानखेडे व समस्त कुटुंबीयांना दिले आहे. हा सर्वोच सन्मान दिल्याबद्दल परीक्षकांचे, संगीत चमू व कलर्स वाहिनेचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Mon Sep 26 , 2022
भव्य कलश, कावड यात्रेने दुर्गा माता मंदिर पिपरी ला नवरात्र महोत्सवाची सुरूवात कन्हान-पिपरी येथे नव दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कन्हान,ता.26 सप्टेंबर      पिपरी या मुळ गावातील जागृत प्रसिद्ध दुर्गा माता मंदिरात नवरात्र महोत्सव “सार्वजनिक दुर्गा माता मंदीर समिती” पिपरी व्दारे पावन कन्हान नदीचे जल १२१ कलशात भरून, नवदुर्गाच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta