धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा उपक्रम साजरा

धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा उपक्रम साजरा

कन्हान,ता.02 ऑक्टोबर

     स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असला तरी मुलीच्या शिक्षणाला गती मिळाली नाही. मुलगा मुलगी हा भेद न करता सुशिक्षित समाज निर्माण करण्यासाठी मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष योगेश रंगारी यांनी केले.

    धर्मराज प्राथमिक शाळेत “एक दिवा लेकीसाठी” हा अनोखा उपक्रम नवरात्रौत्सवाच्या पर्वावर आयोजित करुन मुलीच्या शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय कापसीकर तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य सौ.अरुणा हजारे, चंद्रशेखर बावनकुळे, कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष योगेश बाबू रंगारी व धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये, पर्यवेक्षक सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते.

   नवरात्र उत्सव हा शक्तीचे प्रतिक आहे. महिला वर्ग मोठय़ा भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतो. मात्र या सोबतच जर मुलीच्या विकासाची, प्रगतीची जोड दिली तर खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सव साजरा होऊन मुलींच्या बाबतीतील शिक्षणाची अनास्था दूर होईल या हेतूने धर्मराज प्राथमिक शाळा कांद्री-कन्हान येथे एक दिवा लेकीसाठी हा उपक्रम उपक्रमशील मुख्याध्यापक खिमेश बढिये यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यावेळी मान्यवरांनी मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करीत आपली व परिसरातील प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, मुलींवर अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, भ्रूणहत्या थांबविण्यासाठी, लिंगभेद टाळला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करुन मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. एक दिवा लेकीसाठी या अभिनव उपक्रमाचे शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, गटशिक्षणाधिकारी सौ वंदना हटवार यांनी कौतुक केले.सुंदर फलकलेखन अमीत मेंघरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम तर आभार राजू भस्मे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.चित्रलेखा धानफोले, कु.शारदा समरीत, कु.हर्षकला चौधरी, कु.अर्पणा बावनकुळे, कु.प्रिती सुरजबंसी, कु.पूजा धांडे, कु.कांचन बावनकुळे, सौ.वैशाली कोहळे, सौ.सुनीता मनगटे, सौ.सुलोचना झाडे, सौ.नंदा मुद्देवार, मुख्याध्यापक खिमेश मेश बढिये, भिमराव शिंदेमेश्राम, राजू भस्मे, अमित मेंघरे, किशोर जिभकाटे, महादेव मुंजेवार यांनी सहकार्य केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दोन युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवुन अंगठी घेऊन पसार 

Sun Oct 2 , 2022
दोन युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवुन अंगठी घेऊन पसार कन्हान,ता.02 ऑक्टोबर   नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्गवर कुलदीप मंगल कार्यालय समोर चेतन पान पॅलेस प्रतिष्ठानचा बाजुला दोन अज्ञात युवकांनी पोलीस बनावट ओळखपत्र दाखवत फसवणूक करुन ७.५ ग्राम दोन अंगठी किंमत ३७,५००रु. घेऊन पसार झाल्याने अज्ञात युवकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.   […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta