कन्हान (पिपरी) शेतशिवारात बिबट्याचा मृत्यू
वनविभागाने मौका चौकसी व पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी
कन्हान,ता.२३ नोव्हेंबर
पारशिवनी तालुक्यातील कन्हान-पिपरी, गाडेघाट जुनीकामठी रोड वर दामु केवट व परमानंद शेंडे यांच्या शेतात मृत अवस्थेत बिबट्या आढल्याने एकच खळखळ उडुन घटनास्थळी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत आणि वन विभागाच्या पथका ने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
बिबट हा पिपरी येथील कास्तकार दामु केवट व परमानंद शेंडे यांचे शेतात मृत अवस्थेत आढळुन आल्याने, हरवीर सिंह भावसे सहाय्यक वन संरक्षक रामटेक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत बिबटचे सर्व अवयव साबुत होते. सदर घटनेची माहिती डॉक्टर भारत सिंह हाडा उपवनसंरक्षक नागपुर वन विभाग नागपुर यांना देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने आजुबाजुचा संपुर्ण परिसर पायी फिरून पाहणी केली. परंतु संधिद आढळुन आले नाही. मृत बिबट्याची उत्तरी तपासणी करिता ट्रांजिस्ट ट्रीटमेंट सेंटर सेमिनरी हिल्स नागपूर येथे आणण्यात आले. लॅबोरेटरी मध्ये फॉरेन्सिक तपासणी करिता मृत बिबटचे नमुने घेण्यात आले. सविच्छेदन डॉ. सुजित कोलंगत डब्ल्यू आर टी सी गोरेवाडा, डॉ. विनोद शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर, डॉ. गौतम भोजने, डॉ. काकडे पशुवैद्यकीय अधिकारी ट्रांजिस्ट ट्रीट मेंट सेंटर नागपूर व त्यांचे चमुच्या नेतृत्वात करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांचे निर्देशानुसार प्रतिनिधी कुंदन हाते, गिरीश नाखले तसेच हरवीर सिंह सहायक वन संरक्षक रामटेक, भगत वनपरिक्षेत्र अधिकारी रामटेक ए.सी.दिग्रसे क्षेत्र सहाय्यक पटगोवरी, पी.आर.झारखंडे कन्हान वनरक्षक, एस.जे.टेकाम वनरक्षक आदी हजर होते. सदरची कार्यवाही डॉ.भारत सिंह हाडा उपसंरक्षक नागपूर, वन विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली असून पुढील तपास ए.सी.दिग्रस क्षेत्र सहाय्यक पटगोवारी हे करीत आहे.
Post Views: 239