माॅयल कामगारांच्या प्रश्नांसाठी आरएमएमएस चा पुढाकार
कन्हान,ता.२३ नोव्हेंबर
मॉयल कामगाराच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय मॅगनीज मजदूर संघाच्या वतीने नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार बच्चु कडु यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानी मॉयल सी.एम.डी. उषा सिंग सह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. लवकरच प्रश्नावर तोडगा काढण्याचे मॉयल अधिकाऱ्यांनी आश्वास्त केले आहे .
प्रसंगी उत्पादन व योजना निदेशक एम.अब्दुला, वाणिज्य निदेशक पी.व्ही. पटनायक, पर्सनल जीएम टी.दास, संघटनेचे जनरल सेक्रेटरी पुरणदास तांडेकर व उपाध्यक्ष सतीश बेलसरे प्रामुख्याने उपस्थित होते. कामगारांना नवीन वेतन करारानुसार मासिक एरियस देयकाची संगणकीकृत स्टेस्टमेंट कॉपी देण्यात यावी, वेज रिव्हिजन कराराला संशोधित करण्यात यावे. समस्त कामगार संघटनेला विश्वासात घेतले पाहिजे. अनुकंपा नियुक्ती मध्ये शिक्षणाच्या अटीला शिथिल करण्यात यावे. सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशाच्या अधीन राहून आवश्यक पर्याप्त वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध असलेल्या जिल्हा रुग्णालयाने मेडिकल अनफिट प्रमाणवर त्या कामगाराला अनफिट आणि त्यांच्या जागेवर त्याचा कुटुंबाच्या सदस्याची नियुक्ती करावी. आदी विषयावर मॉयल अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी संघ उपाध्यक्ष फिरोज खान, कदीर खान, श्रीराम सूर्यवंशी, संजय गेडाम, सुधीर शिव, शेख बशीर, सतीश डोंगरीवाल, कैलास गेडाम, नामदेव भारती सह आदि कामगार पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते .
Post Views: 312