सालवा येथे अज्ञात व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु
कन्हान,ता.१५ डिसेंबर
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा रेल्वे पटरीवर अनोळखी व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याने पोलीसांनी सुधीर मसराम यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला आहे.
सोमवार (दि-१२) डिसेंबर रोजी सायं.च्या दरम्यान सुधीर श्यामराव मसराम (वय -५६) रा.गणेश नगर, कन्हान यांनी सालवा रेल्वे पटरी पोल क्र. ११०७ / १६-१८ मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा रेल्वेत अपघात झाल्याने धडापासून डोके वेगळे होऊन मृतकाचे शरीर विखुरलेले अवस्थेत होते. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सुधीर मसराम यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन पो.स्टे.ला मर्ग क. ४२/२२ कलम १७४ जा.फौ.अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रेल्वेत अपघात झालेल्या व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, उंची 5 फुट 4 इंच, रंग सावळा, बांधा- मजबुत. मृतकचे अंगात घातलेले कपडे आयाताकार डब्याचा शर्ट, निळा जिन्स, काळया रंगाचा कोट व पिवळया रंगाचा दुप्पटा, तपकिरी रंगाची अंडरवियर ज्यावर ” KARAN
Body LINE ” लिहिलेले, काळया रंगाचा फुल पॅन्ट, कमरेला लाल रंगाचा धागा असल्याचे वर्णन असून
मृत व्यक्तीची हरविल्याची तकार असल्यास पो.स्टे. कन्हानशी संपर्क साधावा. पो.नि. विलास काळे 9867112185, सतिश फुटाणे 9518334723, महेश बिसने 9552142454 4) कन्हान पोलीस स्टेशन क्र.07102/236246) (विलास काळे ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कन्हान विनंती केली आहे.
Post Views: 222
Fri Dec 16 , 2022
गोंडेगाव येथील शेतात उभी असलेली ई दुचाकी जळून खाक कन्हान,ता.१६ डिसेंबर वेकोली कोळशा खदान येथील गोंडेगाव कॉलनी जवळील मैदानात उभी असलेली दुचाकी वाहन जळून खाक झाली. ही घटना बुधवारी सकाळी ही घटना घडली असुन पोलिसांच्या माहितीनुसार, कन्हान पोलिस स्टेशन हदीतील कोळसा खदान, वेकोली कॉलनीत राहणारे वेकोली […]