पारशिवणी तालुक्यात २१ पैकीं ११ ग्रामपंचायत काॅंग्रेस विजय
भाजप ५ काँग्रेस ११ अपक्ष २ शिंदेभा गट २
कन्हान,ता.२१ डिसेंबर
पारशिवणी तालुक्यातील २१ पैकीं ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजयाचा दावा केला आहे. रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी पारशिवणी तालुक्यात ७७ मतदान केंद्रा वर ७३.८६ टक्के निवडणुक पोलीसांच्या चोख बंदोबस्तात शांततेत पार पडला.
बुधवार (दि.२०) डिसेंबर ला सकाळी १० वाजता पासुन तहसील कार्यालय पारशिवणी येथे मत मोजणीला सुरवात करण्यात आली. सायंकाळ पर्यंत निकाल समोर आले यात ११ ग्रामपंचायती वर काॅंग्रेस ने विजय दावा केला. भाजप – ५ , शिवसेना (शिंदेभा गट) -२ , राकांपा १ , आणि १ ग्रामपंचायत मध्ये अपक्ष सरपंच निवडुन आले.
२१ ग्रामपंचायतच्या १७७ उमेदवार ४३१ रिंगणात उभे होते. विजयी सरपंचांची नावे विनोद इनवाते, भुवनेश्वरी भुरसै, (कंरभाड), सुनिल डोंगरे (निलज), शोभा ढोणे (बखारी), संध्या सर्यामे (खंडाळा डु),पवन बोंद्रे (दहेगाव जोशी), मनीषा दलाल (गोंडेगाव), पुष्पा गोरले (पालोरा), सुधीर अवस्थी (नया कुंड), उषाताई शिवार उके (तामसवाडी), स्वाती घारड (पारडी), मिलिंद देशभ्रतार (नांदगाव), नंदा शेंद्रे (सालई. मो), नीलिमा ठाकरे (सालई माहुली), सविता इवनाते (जुनी कामठी), शुभांगी बावणे (वाघोडा), संजय कोंडवते (खंडाळा म.), संगीता मानवटकर (डुमरी कला),वर्षा खंडाते (मेहंदी), विनोद इनवाते (टेकाडी)
तसेच कन्हान परिसरातील बोर्डा (गणेशी) येथे सरपंच पदाच्या उमेदवार मनीषा दाथुरे व सदस्य पदाच्या दोन उमेदवारांची नावे मतदान यादीत नसल्याने त्यांना मतदाना पासून वंचित रहावे लागले. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आक्षेपही नोंदवला होता. आवश्यक कारवाईनंतर सरपंच पदाच्या उमेदवार रेखा दाथुरे (राष्ट्रवादी) व एका सदस्याला विजयी घोषित करण्यात आले. अनुपालन आदिवासी संवर्गाच्या एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. या एका पदासाठी फेरनिवडणूक करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी दिली.