माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात  दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट 

 

 

माजी आमदार रेड्डी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात

दिडशे च्या वर लोकांनी साखळी उपोषणाला भेट

कन्हान ता.२२ डिसेंबर

     हिंदुस्थान लीवर लीमिटेड ची संपूर्ण १८.७८ एकर भुंखड ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारा खरेदी करण्यात आलेली.  शहराचा मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मिळावा, त्यासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा या मागणी करीता माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी साहेब यांचा नेतृत्व (दि.२२) डिसें.०२२ ला सकाळी ०९.०० वाजता पासून नगर परिषद जवळ साखळी उपोषण सूरू करण्यात आले.

  विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळयाला माल्यार्पण करुन उपोषण सुरू करण्यात आले. उपोषण सुरुवात माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी , लीलाधरजी बर्वे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाति मोर्चा पारशिवनी तालुका, राजेंद्र शेन्द्रे नगर परिषद गट नेते भाजपा, रिंकेश चवरे जिला उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाति मोर्चा नागपुर ग्रामीण, मयूर माटे महामंत्री भाजपा पारशिवनी तालुका अनुसूचित जाती मोर्चा या 5 लोकांना व्दारे साखळी उपोषण करण्यात आले. विविध पक्षाचा व संघटनेच्या १५० लोकांनी उपोषण स्थळाला समर्थन दिले आहे. साख़ळी उपोषण आज पासून ३० डिसेंबर २०२२ पर्यन्त चालणार असून दर दिवशी वेगवेगळे पक्ष व संघटना प्रतिनिधित्व करणार आहेत. ही चळवळ सर्व पक्षीय नागरिक कृती व व्यापारी संघटनाच्या वतीने चालविण्यात येत आहे. या चळवळीच्या माध्यमातून सर्व पक्षाच्या नेत्यांना व जनप्रतिनिधिना आह्वान करण्यात येते की, त्यांनी या चळवळीत सहभागी होऊन कन्हानच्या नागरिकांच्या हितासाठी ही मागणी पूर्ण करण्यास सरकारला बाध्य करावे. जो पर्यन्त मागणी पुर्ण होत नाही तो पर्यन्त हे चळवळ सुरू ठेवण्याचे समितिचा निर्धार आहे.

आजच्या उपोषण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात करण्यात आले. त्याच प्रमाणे आज सामाजिक युवा संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विक्की जीभकाटे, उपाध्यक्ष विनोद जी किरपान यांच्या द्वारे या साखळी उपोषणाला समर्थन पत्र माननीय माजी आमदार श्री रेड्डी साहेब  यांना देण्यात आले. उदया (दि २३) डिसेंबर ला कांग्रेस पक्षाचे वतीने उपोषण करण्यात येणार आहे. असे ३० डिसेंबर पर्यंत सर्व पक्षाचे व सर्व संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला यश बेकायदेशीर महामिनरल कोल वॉशरीला लावले कुलुप. 

Sun Dec 25 , 2022
जय जवान जय किसान संघटनेच्या आंदोलनाला यश बेकायदेशीर महामिनरल कोल वॉशरीला लावले कुलुप. कन्हान,ता.२३ डिसेंबर ( सुनिल सरोदे)       पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव वेकोली हद्दीतील वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महामिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड कोल वाॅशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta