हिंदुस्तान लिव्हर ची जागा शहराकरिता घेण्या संदर्भात मुख्यमंत्री यांचे कडे बैठकीची मागणी
सर्वपक्षीय नागरिक कृती समिती, व्यापारी संघटनेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन.
कन्हान,ता.२८ डिसेंबर
शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन विक्री झाल्याने शहराच्या विकास कार्य आणि मुलभुत सुविधावर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करून निवेदन देऊन तात्काळ हिंदुस्तान लिव्हर कंपनीची संपुर्ण जागा नगरपरिषदेने घेण्या संदर्भात मा. मुख्यमंत्री यांचा कडे बैठक घेण्याची मागणी केली आहे.
मागील कित्येक वर्षापासुन अनेक राजकीय आणि विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिका-यांनी नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊन हिंदुस्तान लिव्हर कंपनीच्या जमीनीवर मार्केट यार्ड, हाॅकर्स झोन,आठवडी व गुजरी बाजार, भाजीपाला विक्रेता दुकानदार, बस स्टैंड आणि शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता उपयोगात घेण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद प्रशासनाने सदर विषयाकडे गंभीर्याने लक्ष केंन्द्रीत न केल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जमीन खाजगी लोकांना विकण्यात आली. यामुळे शहराच्या सर्वांगीण विकास कार्यावर प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक वर्षापासुन शहरात रिकामी जागा नसल्याने राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर फुटपाथ, गुजरी आणि आठवडी बाजार भरत असल्याने नागरिकांना व दुकानदाराना जिव मुठीत घेऊन सामानाची खरेदी विक्री करावी लागत आहे. यास्तव विविध संघटने द्वारे अनेकदा नगरपरिषद प्रशासनास निवेदन देऊन ही प्रशासन झोपेतुन जागा न झाल्याने हिंदुस्तान लिव्हर कंपनीची जागा बाहेरील खाजगी लोकांना विकण्यात आल्याने शहरातील सर्वांगीण विकास कार्यावर व मुलभुत सुविधावर आता प्रश्न निर्माण झाले आहे.
कन्हान शहराच्या सार्वजनिक मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी हिंदुस्तान लिव्हर कंपनीची संपुर्ण १८ एकर जागा अति आवश्यक असल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या पदाधि काऱ्यांनी केंद्रीय मंत्री मा.नितिन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करुन निवेदन देऊन तात्काळ हिंदुस्तान लिव्हर कंपनीची संपुर्ण जागा कन्हान शहराच्या सर्वागिन विकासा करिता नगरपरिषदेने विकत घेण्या संदर्भात मा.मुख्यमंत्री यांचे कडे बैठक घेण्याची मागणी केली आहे. प्रसंगी मा.राजेश ठाकरे जिल्हा अध्यक्ष ग्रामविकास आघाडी, मा.अकरम कुरेशी अध्यक्ष व्यापारी दुकानदार संघ, सौ.शालिनी बर्वे उपाध्यक्ष भाजपा महीला आघाडी नागपुर ग्रामिण, मा.लिलाधर बर्वे अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका, रिंकेश चवरे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनु. जाती मोर्चा नागपुर ग्रामिण, मनीष भिवगड़े गट नेता नगरपरिषद कन्हान, मा.शैलेश शेळके संपर्क प्रमुख भाजपा पारशिवनी तालुका, कु.रेखाताई टोहणे नगर सेविका, मयुर माटे महामंत्री भाजपा अनु.जाती मोर्चा पारशिवनी तालुका, अमर मोहबे सह सर्व पक्षीय नागरिक कृती समिती पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.