भाजप नेता आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांना जीवे मारण्याची धमकी
कन्हान,ता.२८ डिसेंबर
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गजानन नगर वार्ड क्रमांक पाच कांद्री येथील भाजपा नेता व माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांना तीन आरोपींनी दोन लाख रुपए खंडणीची मागणी केली. न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त माहिती नुसार, योगेश रघुनाथ वाडीभस्मे (वय ५४) रा.वार्ड क्रमांक पाच युनियन बॅंकेचा वर कांद्री , कन्हान यांना दोन तीन दिवसापुर्वी आरोपी मोगली पात्रे (वय ३०) रा.एम.जी.नगर कन्हान याचा फोन योगेश यांचा मोबाईल वर वारंवार फोन येत होता. त्या दरम्यान योगेश यांनी आरोपी मोगली यांचा फोन उचलून त्याच्या सोबत फोनवर बोललो असता, त्याने योगेश यांना सांगितले कि “माझ्यावर तडीपार चा आदेश निघाला आहे त्या आदेशाला आपण आपल्या वरिष्ठांची माहिती घेवून तो आदेश खारीज करावा असे बोलून त्याने आपले बोलने बंद केले”. तेव्हा योगेश यांनी त्याला म्हटले कि “हे काम होणार नाही. त्या व्यतिरित्क दुसरे कोणते काम असेल तर मला सांग असे म्हणुन योगेश यांनी आपला फोन बंद करुन दिला. त्यानंतर थोड्या वेळाने फोन येत होता त्यामुळे योगेश यांनी आरोपी मोगली याचा फोन उचलून त्याचा सोबत पुन्हा बोलले त्यावर तो म्हणाला की, “तुमची मा.बावनकुळे साहेब सोबत चांगली ओळख आहे. त्यांना सांगुन हे माझे काम करावे असे म्हणुन आरोपी मोगली याने योगेश यांना भेटासाठी शेतावर येतो असे म्हणून फोन ठेवला. (दि २१) रोजी दुपारी ३:३० ते ४:०० वाजता च्या दरम्याण योगेश वाडीभस्मे हे आपल्या शेतातील लोकांच्या कामा वर पाहणी करित असतांना मोटर सायकल वर मोगली पात्रे (वय ३०) वर अजुबा पात्रे (वय २५) पांढरी टि शर्ट घातलेला अज्ञात आरोपी असे सर्व रा. एम. पी. नगर कन्हान हे योगेश यांचा शेतात गेले. योगेश यांना आवाज दिला असता योगेश यांनी त्यांना माझ्या कडे येण्यास म्हटल्यावर त्यांनी योगेश यांना निंबाचा झाडाकडे या असे म्हणुन त्याने योगेश यांना हाक मारली त्यावर योगेश हे एकटेच आरोपी कडे गेले. आरोपी मोगली पात्रे याने “मुझे आपसे मदत होणा असे म्हणाला” तेव्हा योगेश यांनी त्याला म्हटले की तुझ्यावर तडीपारची केस आहे तर मी ते साहेबांना म्हणून निपटविन असे म्हटले असता त्याने म्हटले की, मी तडीपारची केस पैसे देवून निपटवुन घेतली आहे आता दुसरी मदत पाहीचे असे म्हणून मोगली पात्रे याने योगेश जवळ असलेली लोखंडी खाटेवर येवुन बसला. मोगली याने शर्टाचा आतून चाकू काढला व स्वताच्या हातावर चालवुन रक्त काढला आणि म्हणाला कि देखा भाऊ ऐसा खुन निकलता है लाल लाल असे म्हणुन इतर दोघांनी पॅन्टाच्या मागच्या खिशातून चाकु काढला. आरोपी मोगली याने म्हटले की भाऊ मला दोन पेटी पाहीजे नेपाल येथे जायचे आहे. तेव्हा योगेश यांनी त्यास ऐवठे पैसे कुठून देवु असे म्हटले असता त्याने म्हटले की भाऊ पैसे द्याच लागेल पैसे न दिल्यास या चाकूने तुझे लाल लाल रक्त काढेल अशी धमकी दिली. ते तिथे निघुन गेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी योगेश वाडीभस्मे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी मोगली पात्रे ,अजुबा पात्रे अज्ञात आरोपी यांचा विरुद्ध कलम ३८७ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .