प्राथमिक आरोग्य केंद्रात कैसंर व विविध आरोग्यांची तपासणी
नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे १२४ नागरिकांची तपासणी
कन्हान,ता.२८ डिसेंबर
प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक द्वारे कैसंर शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात एकुण १२४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. प्रसंगी डाॅक्टरांनी शिबीर कार्यक्रमात नागरिकांना धुम्रपान, दारुचे सेवन न करण्याचे आव्हान केले आहे.
सर्व प्रथम नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक चे डॉ.पवन वरखेडे, डॉ.सुजात पाटील, डॉ.शुभांगी सोमलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत वाघ, यांचा प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ.शशांक राठोड आणि त्यांचा संपुर्ण चमुने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करीत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कैसंर शिबीरामध्ये नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक चे डॉ.पवन वरखेडे, डॉ,सुजात पाटील, डॉ. शुभांगी सोमलकर यांचा द्वारे १२४ नागरिकांच्या विविध आरोग्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी नेशनल कैंसर इंस्टीट्यूट पथक च्या डॉक्टरांनी कैसंर कसे टाळावे. या बद्दल माहिती दिली. नागरिकांना धूम्रपान, दारू व इतर नशा न करण्याचे आव्हान केले. तसेच सूर्यप्रकाशाचा संपर्क टाळा, फायबरयुक्त आहार घ्या. आहारात जास्त चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये आणि लाल मांस वापरू नये. बाहेरचे खाद्य व पॅकिंग युक्त अन्न खाऊ नये, किरणोत्सर्गाचा धोका असेल, तर पुरेशी सुरक्षा उपकरणे घाला. नियमित व्यायाम करा आणि शरीराचे वजन सामान्य ठेवा. तुमचा बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) दररोज तपासा, तुमच्या शरीराची नियमित तपासणी करत राहावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली तर ती लगेच ओळखता येईल , जर त्वचा निळी पडू लागली. जखम बरी होत नसेल किंवा दीर्घकालीन आजार असेल तर त्याबद्दल डॉक्टरांशी संपर्क साधा. सर्व लसीकरण नियमितपणे करावे असे कडकडीचे आव्हान शिबीर मध्ये या प्रसंगी सांगितले.