पेंच पाटबंधारे चा बोरी (सिंगोरी) गावात कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान
शेतक-यांच्या ८० एकरावरील गहु व हरभरा पिक पाण्यात बुडुन नुकसानीने शेतकरी हतबल.
कन्हान,ता.२८ डिसेंबर
तालुकातिल पेंच पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या टेकाडी उपविभागातील बोरी (सिंगोरी) गाव शेतशिवारातील कालवा फुटल्याने गावातील १६ ते २० शेतकऱ्यांचे उभे असलेले गहु व हरभरा पिके पुर्णपणे पाण्यात बुडाल्याने शेतपिक उद्ध्वस्त झाल्या ने शेतकरी हतबल झाला आहे.
मंगळवार (दि.२७) ला सकाळी शेतकरी शेतात गेले तर त्यांच्य शेतात पाणीच पाणी साचुन शेत पिक पाण्यात बुडाली बघायला मिळाले. त्यांच्या शेतातील गहु, हरभरा पिकांमध्ये पाणी शिरले पाहुन त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजता पाटबंधारे अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी थेट शेतकऱ्यांशी उलट बोलणे सुरू केले. याबाबत तहसिलदार प्रशात सांगळे यांना माहिती दिली.
पेंच पटबंधारेच्या अधिका-यांनी कालवा बनविताना निष्का ळजीपणा व व्यवस्थित कालव्याचे (नहराचे) काम कंत्राटव्दारा कडुन करून न घेतल्याने हा कालवा फुटुन आम्हा शेतक-यांच्या उभ्या पिकाचे नुकसान होऊन तोंडता घास हिसकावल्या गेल्याने या नुकसानी चे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या त यावी. तसेच संबधित पाटबंधारे विभागातील अधि कारी व जवाबदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय सत्यकार शेतकरी नेते व परीसरातील शेतकरी, ग्रामस्थानी केली आहे.
Post Views: 298
Wed Dec 28 , 2022
ऑटोरिक्षाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी कन्हान,ता.२८ डिसेंबर कांद्री- कन्हान नॅशनल महामार्ग क्रं ४४ वरील सर्विस रोड वर पोटभरे यांचा शेता जवळ ऑटोरिक्षा चालकाने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जख्मी झाल्याने रोहित यांच्या तक्रारी वरून ऑटोरिक्षा चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला. प्राप्त […]