“गण गणात बोते” श्री च्या गजरात दुमदुमली कन्हान नगरी
“श्री” च्या पालखीचे कन्हान- कांन्द्री नगरीत भव्य स्वागत
कन्हान,ता.०४ जानेवारी
श्री संत गजानन महाराज सेवा समिती टिमकी, नागपुर व्दारे श्री संत गजानन महाराजांची नागपुर ते श्रीक्षेत्र रामटेक पायदळ पालखीचे सत्रापूरच्या काली माता मंदिर परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले.
सकाळी पालखीचे राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान- कांद्री नगर भ्रमण केले. यावेळी रस्त्यावर रांगोळी, फुलांच्या पाखळ्या टाकुन “श्री ” च्या पायदळ पालखीचे भव्य स्वागत केले व असंख्य भाविकांनी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले.
बुधवार (दि.४) जानेवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता पायी दिंडी पालखी यात्रेचे आगमण झाले.मंदीरात पुजा-अर्चना, आरती करून सकाळी ६ वाजता नागपुर- जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गाने कन्हान नगर प्रदक्षीणा करण्यात आली. गणेश नगर, श्री हनुमान, श्री गजानन मंदीर, तिवाडे ले-आऊट कन्हान, पांधन रोड ते आंबेडकर चौक राष्टीय महामार्गावरील श्री गजानन सॉ मिल, श्री काकडे निवास येथे पोचली. चहानास्ता केल्यानंतर महामार्गाने श्री आकरे पेट्रोल पंप कांद्री येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली. बोरडा-नगरधन मार्गे “जय गजानन, जय गजानन”, “गण गण गणात बोते ” मुदुंग टाळाच्या गजरात श्री श्रेत्र रामटेक करिता प्रस्थान करण्यात आली. पालखीत ३०० पेक्षा अधिक महिला व पुरुष वारकरी सहभागी झाले. पालखी चोपदार, पताकाधारी, गायनाचारी, मृदंगाचारी, टाळकरी, विणाधारी व फुलांनी सजलेल्या पालखीत “श्री गजानन महाराजांच्या मुर्ती दर्शनाचा मोठया संख्येने दर्शनाचा लाभ घेतला.श्री गजानन महाराज पायी दिंडी पालखी यात्रे चे कन्हान शहरातील गणेश नगर अमोल प्रसाद यांनी काफी चे वितरण करून स्वागत केले. यशनंत निर्वाण, रामुजी ठाकरे, गणेश हर्षे, वसंतराव इंगोले, भुषण निंबाळकर, रंजित पाजुर्णे, बबनराव इंगोले, मडगे काकाजी, गितेश मोहणे, माघव काठोके, सुनिल सरोदे, अविनाश रायपुरे, उमेश काकडे आदीने स्वागत व पुजा केली. नगरसेविका गुंफाताई तिडके व सुर्यकांत तिडके, शेखर बोरकर यांनी केळी, फराळी पॉकीट, बिस्कीटचे वितरण करून स्वागत केले. श्री गणेश सेवा समिती व श्री हनुमान मंदीर समिती व्दारे चाय बिस्कीट चे वितरण करून स्वागत करण्यात आले. श्री गजानन सॉ मिल व काकडे परिवार व्दारे अल्पोहार चाय वितरण करून ” श्री ” दर्शनाचा लाभ घेतला.
जय शितला माता मंदिर द्वारे “श्री” च्या पालखी यात्रेचे जल्लोषात स्वागत.
राष्ट्रीय चारपदरी महामार्गात जय शितला माता मंदिर कांद्री द्वारे पालखीचे फुलांच्या वर्षावात आणि ११ किलो बुंदी लाडु वितरण करुन जल्लोषात स्वागत केले. प्रसंगी संजय चौकसे, वामन देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, उषा मरघडे, हंसाबेण पटेल, किर्ती हटवार, लता बाव नकुळे, प्रकाश हटवार, अशोक खैरकर, प्रेमचंद चव्हान सह भाविक नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. तदंतर भुमिपुत्र सघटन व अतुल हजारे मित्र परिवार व्दारे पालखी सामोर पाच घोडयाची सलामी देत कांद्री गावाचे भ्रमण करून श्री आकरे निवास आणि आकरे पेट्रोल पंप येथे “श्री” पालखी च्या सर्व भाविकांना अल्पोहार व चहा वितरण करून “श्री” च्या दर्शन घेतले.
श्री संत गजानन महाराज पायी पालखी यात्रेचे शहर विकास मंच द्वारे स्वागत
आगमन झाले असता कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये श्री संत गजानन महाराज यांचा पालखीचे फुलांच्या वर्षावात , पुष्प हार आणि विधिवत पूजा अर्चना करून स्वागत केले .प्रसंगी मंच मार्गदर्शक प्रभाकर रुंघे, कोषाध्यक्ष भुषण खंते, शाहरुख खान, योगराज आकरे, सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .