एम.जी.नगर येथे भुंखडावर मालकी हक्क दाखवत अवैध कब्जा
न.प. व पो.स्टेशन कारवाही करत नसल्याचा पत्रकार परिषदेत आरोप
कन्हान,ता.२३ जानेवारी
नगरपरिषद हद्दीतील तारसा रोड, एम.जी. नगर कन्हान येथे श्रीचंद शेंडे यांच्या मालकीच्या भुखंडावर दलजीत पात्रे यांनी आपले मालकी हक्क बजावत अवैध बांधकाम केल्याने भुंखडावरील ताबा सोडण्यास सांगितले असता शिविगाळ करून आणि जीवे मारण्याची धमकी देत असतो. त्यामुळे नगरपरिषद व पोलीस स्टेशन ला पात्रे यांचा विरोधात तक्रार दिल्या नंतर सुध्दा काहीही कारवाई होत नसल्याने पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळण्याची मागणी श्रींचद शेंडे यांनी केली आहे.
हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन कन्हान येथे पत्रपरिषदेत श्रींचद शेंडे यांनी सांगितले की, प्रदीप आप्पा हरडे यांच्या मालकी च्या भुखंडावर लेआऊट पाडण्यात आले होते. इ.स.१९८८ मध्ये बिहनबाई रामखिलन गुप्ता रा. शिवाजी नगर कन्हान यांनी हरडे यांच्या कडुन अकरा हजार रुपये किंमती ला विकत घेतले होते. त्यानंतर इ.स.१९८९ मध्ये बिहनबाई राम खिलन गुप्ता यांचे कडुन श्रीचंद गजानन शेंडे यांनी वीस हजार रुपयात १५०० फुट भूखंड विकत घेतला होता. आर्थिक परिस्थिती नसल्याने भूखंडाची (प्लॉट ची) रजिस्ट्री करून घेतली नव्हती. मात्र विस वर्षां पुर्वी ग्राम पंचायत कन्हान येथे फेरफार करून मुलगा निशाल श्रींचद शेंडे च्या नावाने कर स्वरूपात लावुन घेतले. कर आकारणी यादी मध्ये सुद्धा नोंद करून घेतली आहे. त्यामुळे अवैध बांधकाम केलेला भुंखड पुर्ण पणे माझा मालकी हक्काचा आहे.
मात्र शेजारी राहत असलेला दलजित पात्रे यांनी मोकळी जागा असल्याने विकत घेण्यासाठी मागणी करू लागला. मी विक्रीस तयार नसल्याने त्यानी खाली भुंखडावर टिना च्या शेडचे पक्के बांधकाम करून अवैध कब्जा केला आहे. माझ्या मालकीची जागा असल्याने, मोकळी करायला सांगितले तर स्वत:च्या मालकीची असल्याचे सांगुन मलाच कागदपत्र दाखवण्यासाठी धमकावतो. त्याच्या म्हणण्या प्रमाणे कागदपत्र दाखविल्या नंतर सुद्धा जागा खाली करायला तयार नाही. उलट आई- बहीनीच्या शिव्या देत जीवे मारण्याची धमकी देतो. संबंधित भुखंडा विषयी तक्रार नगरपरिषद कन्हान-पिपरी, पोलीस स्टेशन कन्हान ला करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप नगरपरिषद आणि पोलीस स्टेशन च्या अधिका-यां कडुन योग्य कारवाई करण्यात आली नसल्याने प्रशासनाने लवकरात लवकर माझ्या भुखंडा वरील अतिक्रमण काढुन मला न्याय देण्याची मागणी श्रीचंद गजानन शेंडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
——–
नगराध्यक्षा सौ.करूणाताई आष्टणकर
श्रीचंद गजानन शेंडे यांनी नगरपरिषद मध्ये दलजीत पात्रे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. यावर नगरपरिषद कार्यालयातुन दलजित पात्रे याला जमिनी संबंधित कागदपत्रे नगरपरिषदेला सात दिवसांत सादर करण्यात सांगितले. मात्र दलजित पात्रे यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेले नाही. श्रीचंद शेंडे यांनी कागदपत्रे सादर केले आहे. नगरपरिषदे च्या मुख्याधिकारी यावर काय आदेश देतात, त्या नुसार योग्य कारवाई करण्यात येईल.
————
कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे
श्रीचंद शेंडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावर पात्रे यांचे चौकशीचे आदेश दिले. त्याला पोलिस स्टेशन ला जमिनी संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले. कागदपत्र नसल्यास पोलीस स्टेशनच्या वतीने योग्य कारवाई करण्यात येईल.
Post Views: 219