पोलीस तपासात राहुल सलामेच्या मृत्यूने कन्हान शहरात तणाव
आदिवासी समाज बांधवांनी पोलिसांवर रोष व्यक्त करून कारवाईची मागणी
कन्हान,ता.१९ फेब्रुवारी
शहरातील आठवडी बाजारात तरुणांच्या टोळीने स्थानिक नागरिकांसह दुकानदारांवर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नागरिकांनी या घटनेचा विरोध करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर रास्ता रोको केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. प्रकरणी ठाणेदार विलास काळे यांची उचलबांगडी करून प्रमोद मकेश्वर यांची नियुक्ती कन्हान पोलिस निरीक्षक म्हणून करण्यात आली. धुमाकूळ घालणाऱ्या आरोपी पैकी राहुल ला पोलिसांनी ताब्यात घेतले विचारपूस करण्याच्या नावाखाली चोप दिला. त्यामुळे उपचारादरम्यान त्याच्या मृत्यू झाला. असा आरोप करत निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी आदिवासी बांधवांनी पोलिसांकडे केलेली आहे.
पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील परिसरात आठवडी बाजारात काही गुंडांनी (दि.३) फेब्रुवारीला धुमाकूळ घातला होता. ज्याची दखल घेत आमदार आशीष जैस्वाल यांनी पोलीस अधिकाऱ्यावर अवैध धंद्याच्या बोलबाला व वसुली सुरू असल्याच्या आरोप करून भर चौकात सुनावले होते. घटनेनंतर काही आरोपीच्या नावे तक्रार होत्या तपासासाठी पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. विकी उर्फ राहुल सलामे (वय३०) याला ताब्यात घेऊन चोप दिल्याचा आरोप नातेवाईकांच्या आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पोलीस अधिकाराचा गैरवापर करून मारहाण केल्याने राहुल परिवार चिंतेत होता.(दि.१७) फेब्रुवारीला रात्री दहा वाजता राहुलला उपचार दरम्यान मृत्यू झाला. वृत्त परिसरात पसरतात प्रशासनविरोधात कुटुंबाच्या व आदिवासी समाज बांधवांच्या रोष व्यक्त करण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर सत्य समजणार आहे मात्र विलंब होत असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. आठवडी बाजारात शस्त्राचा जोरावर धुमाकूळ घालण्याचे कारण काय हे गुलदस्तात आहे. या प्रकरणाची उत्तर तपासणी चौकशी मागणी होत आहे. राहुल हा कामठी व नागपूर येथील इंग्रजी शाळेत मुलांना डान्स शिकवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याला अडीच वर्षाची मुलगी आहे. त्याच्या मृत्यूने आदिवासी दुखावल्यात २४ तास उलटूनही मृत्यु देह कुटुंबाच्या स्वाधीन केलेला नाही.
पोलिस अधिक्षक विशाल आनंद, विभागीय अधिकारी मुक्तार बागवान, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतल नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पारशीवनी, सावनेर, खापरखेडा, मौदा, देवलापार, रामटेक, नरखेड, अरोली, उमरेड आदी पोलीस स्टेशन मधून दहा अधिकारी व ६० कर्मचारी बोलावले असून चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी सांगितले की आठवळी बाजारात दहशत निर्माण करणारे दहा आरोप मधून सहा अटक असून चार अद्याप फरार असून त्यात खैलेश सलामे व शुभम सलामे समावेश आहे. राहुल सलामेच्या अंतिम संस्कार करण्यात आले की पुढील कारवाई करण्यात येईल.
…….
पोलीस प्रशासनावर योग्य कारवाई व भरपाईची माग
आठवळी बाजारात दहशत निर्माण करून तोडफोड करण्यात माझ्या दोन मुले असल्याचे सांगितले गेले.त्यामध्ये राहुल सलामे त्यांचा सोबत नसुन तो घरी आराम करीत होता. मात्र आरोपी मुले सापडत नसल्याने राहुलला चौकशीचा नावाखाली रात्री घेऊन गेले. तो पुर्णपणे ठीक असुन तो आपल्या पायावर चालत गेला.दुसरया दिवशी त्याचा पत्नीला फोनवर सांगितले की, तब्येत बिघडली असुन रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आम्हाल न कळवता राहुल सलामे याला मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तब्येत जास्त बिघडल्याने (दि.१७) फेब्रुवारी रोजी सायंकाळी दहा वाजता दरम्यान मृत्यू झाला. राहुल सलामेच्या मृत्यूचे पुर्ण पोलीस प्रशासन विभाग जबाबदार असुन त्यावर कारवाई करण्यात यावी आणि घरचा एकटाच कमवता असल्याने कुटुंबाच्या भरणपोषण करीता भरपाई देण्याची मागणी मृतक राहुल सलामे यांचे वडीलांनी केली आहे.