आदिवासी समाज बांधवांनी प्रेत खाली ठेवून पोलीस स्टेशनच्या घेराव
जमावाला पांगवण्याचा नादात पोलिसांनी प्रेत स्वतः खांद्यावर घेऊन ओढाताण
दोषी पोलिसांवर सात दिवसांत कारवाईची मागणी – माजी खासदार प्रकाश जाधव
कन्हान,ता.१९ फेब्रुवारी
पारशीवनी तालुक्यातील कन्हान शहरातील परिसरात आठवडी बाजारात काही गुंडांनी (दि.३) फेब्रुवारीला धुमाकूळ घातला होता. ज्याची दखल घेत आमदार आशीष जैस्वाल यांनी पोलीस अधिकाऱ्यावर अवैध धंद्याच्या बोलबाला व वसुली सुरू असल्याच्या आरोप करून भर चौकात सुनावले होते. घटनेनंतर काही आरोपीच्या नावे तक्रार होत्या तपासासाठी पोलिसांनी आरोपीच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. विकी उर्फ राहुल सलामे (वय३०) याला ताब्यात घेऊन चोप दिल्याचा आरोप नातेवाईकांच्या आहे. त्याला उपचारार्थ नागपूर येथील मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पोलीसांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मारहाण केल्याने राहुलचा परिवार चिंतेत होता. (दि.१७) फेब्रुवारीला रात्री दहा वाजता राहुलचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.
राहुल सलामेच्या नागपूर रूग्णालय मधून चौवीस तासांनंतर मृत देह कुटुंबाच्या स्वाधीन झाल्यानंतर आदीवासी समाज बांधवांनी व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात कांग्रेस अध्यक्ष नरेश बर्वे, रमेश कारेमोरे, उपसरपंच श्याम बर्वे, नगरसेवक योगेश रंगाची, नगरसेवक मनीष भिवगडे व कन्हान शहरातील हजारो संख्येने उपस्थित जनसमुदायाने कन्हान पोलीस स्टेशन समोर मृत राहुल सलामे यांचे प्रेत खाली ठेवून पोलीस विभाग विरूद्ध आक्रमक भूमिका घेतली. पोलिस कर्मचारांनी जमावाला पांगवण्यासाठी लाश स्वतःचा खांद्यावर घेऊन लाशीला रोडाचा पलीकडे नेऊन ठेवले. जमावाची व कुटुंबातील सदस्यांची चर्चा तासभर चालत असे पर्यंत प्रेत रस्त्यावर होती. मेल्यानंतरही मृतदेहाची अवहेलना झाल्याची दिसून आली.
पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या समक्ष पत्नीला व कुटुंबातील सदस्यांच्या भरणपोषण करीता न्याय देण्याची मागणी तसेच पोलीस विभागातील कर्मचारी लोकांनी घरून जबरदस्तीने बोलावून चोप दिलेल्या पोलीसांवर सात दिवसांत कारवाईची मागणी केली. अन्यथा पोलीस स्टेशन समोर आंदोलनाचा करण्याचा इशारा माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिला. आमदार आशीष जैस्वाल यांनी पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणून आरोपी वर कडक कारवाई करण्यासाठी भाग पाडल्याने तडकाफडकीत कारवाई मध्ये पोलीसांनी निर्दोष मुलांचा नाहक बळी घेतला असल्याचा आरोप करीत आमदार आशीष जैस्वाल मुर्दा बाद ,मुर्दा बाद व पोलीस ठाणेदार मुर्दा बाद मुर्दा बाद घोषणा दिल्या. यामुळे महामार्ग क्रं ४४ एक तास बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली. अचानक जमाव आक्रमक झाल्याने पोलीसांना घाम फुटला जमावाला शांत करण्यासाठी तारावरची कसरत करावी लागली. नागपूर जिल्हा ग्रामीण विभागा मधून बोलवण्यात आलेल्या दहा अधिकारी व ६० पोलीस कर्मचारीने वेळेत जमावाला पांगवत घेराव केल्याने अनुचित प्रकार घडू शकला नाही. यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात आलेल्या जमावाचा रोष बघता व जाधव, नरेश बर्वे यांच्या चर्चा नंतर पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान यांनी दोषी पोलीस कर्मचारीवर्गावर सात दिवसांत कारवाई करण्यासाठी लेखी पत्र दिल्यानंतर कुटुंबाच्या सदस्यांनी व आदिवासी समाज बांधवांनी प्रेत अंतीम संस्कार करण्यासाठी घेऊन गेले.
Post Views: 1,133
Mon Feb 20 , 2023
कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त वृक्षदान नागपूर,ता.२० फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कल्पवृक्ष ट्री संस्थेतर्फे वृक्षदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तुळशीचे रोप दान करण्यात आले. तुळशीचे रोप दान करण्यामागे एकच उद्देश लोकांना वृक्ष लागवडीच्या कामासाठी प्रवृत्त करणे हा आहे. आज ज्या […]