राष्ट्रीय १७ व्या आष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धेत व्दितीय पुरस्कार
सुवर्ण पदक प्राप्त खेडाळुला परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव
कन्हान,ता.०१ मार्च
तामिळनाडु येथे झालेल्या राष्ट्रीय १७ व्या आष्टेडु मर्दानी आखाडा स्पर्धेत महाराष्ट्राने व्दितीय पुरस्कार प्राप्त केला आहे. यात परमात्मा एक दांडपट्टा मर्दानी आखाडा निमखेडाचे खेळाडु गौरव बावने, साक्षी सुर्यवंशी व उर्वशी मलेवार यांनी सुवर्ण पदक पटकावल्याने नागपूर ग्रामीण परिसरातुन विजयी खेडाळु वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच तामिळनाडु येथे (दि.२५ व २६ ) फेब्रुवारी २०२३ ला राष्ट्रीय १७ व्या आष्टे डु मर्दानी आखाडा चाॅम्पियन शिप स्पर्धेत आष्टेडु मर्दानी आखाडा महाराष्ट्र सचिव महागुरू राजेश तलमले सर, नागपुर जिल्हा ग्रामिण सचिव गुरू राजु बाबा कवरे, नागपुर जिल्हा ग्रामिण गुरू व प्रशिक्षक मोहन वकलकार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र ला व्दितीय पुरस्कार बहाल झाला आहे. यात परमात्मा एक दांड पट्टा मर्दानी आखाडा निमखेडा येथिल खेळाडु गौरव राजेंद्र बावणे ( शिवकला ) सुवर्ण पदक, कु.साक्षी राजुजी सुर्यवंशी ( शिवकला ) सुवर्ण पदक, कु. उर्वशी रमाकांत मलेवार ( शिवकला ) सुवर्ण पदक प्राप्त करित विजय मिळविल्याने ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर ग्रामिण उपाध्यक्ष दिलीप राईकवार, प्रविण गोडे, निशांत जाधव, मराठा सेवा संघ कन्हान चे शांता राम जळते, ताराचंद निंबाळकर, राकेश घोडमारे, परमात्मा एक दांड पट्टा मर्दानी आखाडा निमखेडा चे हर्षल मल्लेवार, अल्केश वकलकर, कु सेजल बावने, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष मोतीराम रहाटे, कमलसिह यादव, सुनिल सरोदे, गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी चे निलेश गाढवे, अनिकेत निमजे, कु निकिता बेले आदीने विजयी खेडाळु चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कन्हान परिसरातुन विजय खेडाळुवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Post Views: 753
Sun Mar 5 , 2023
बिबट्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ सावनेर : सावनेर पांढुर्णा रोडवरील हेटी शेवर येथे नर बिबट्या मु्त अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली असून मु्त बिबट्या पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली. 4 मार्च रोजी सकाळी 11-00 वाजेच्या सुमारास सावनेर पांढुर्णा येथील हेटी शिवारात नर बिबट्या मु्त अवस्थेत असल्याची माहिती ठाणेदार मारुती मुळुक तसेच हितज्योती […]