सुरक्षा रक्षकाला मारल्याने महीलांवर गुन्हा दाखल 

सुरक्षा रक्षकाला मारल्याने महीलांवर गुन्हा दाखल

कन्हान,ता.०५ मार्च

     ईगल इंफ्रा प्रायवेट लिमिटेड खदान नं. सहा येथे दहा ते बारा महिलांनी कंपनीचा आत जबरदस्तीने प्रवेश करुन कर्तव्य बजावत असलेला सुरक्षा रक्षकाला कानशीलात झापड मारत, जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीसांनी परशुराम गौतम यांच्या तक्रारी वरून दोन महिला विरुद्ध गुन्हा दाखल केला.

    पोलिसांच्या माहिती नुसार, शनिवार (दि.४) मार्च ला ईगल इंफ्रा प्रायवेट लिमिटेड कंपनीत परशुराम मख्खनजु गौतम (वय-३१) रा.वार्ड क्र.४ कांद्री, मुख्य प्रवेशद्वार वर ड्युटीवर होता. सोबत सुरक्षा रक्षक बल्लन शामलाल गोस्वामी (वय ३२) रा.खदान नं.सहा , सुनील सौरू कुशवाह (वय ३०) रा.खदान नं सहा असे तीघे मिळुन मुख्य प्रवेश द्वारवर कर्तव्य बजावत होते. दुपारी एक वाजता च्या दरम्यान परशुराम यांचा ओळखीची महिला इंद्रावती कुर्मी व त्यांची मुलगी कु.दीपिका कुर्मी व तिच्यासोबत 10 ते 12 महिला मुख्य प्रवेश द्वार वर आले. सुरक्षा रक्षकांना न विचारता मेन गेट मधून आत जात होते . यावेळी सुरक्षा रक्षकांनी महिलांना विचारले कि “तुम्ही कुठे चालला आहात” तेव्हा महिलांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले कि, “तुमच्या साहेबांना भेटायला जात आहोत.”

प्रसंगी रक्षकांनी त्यांना म्हटले , कि तुम्ही थांबा, आम्ही आमच्या सरांना विचारुन येतो. असे म्हटल्या सुध्दा महिलांनी मान्य न करता जबरदस्तीने मुख्य गेट मधून आत गेले. यावेळी सुरक्षा रक्षक परशुराम यांचा सह ड्यूटी वर हजर असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी बल्लन शामलाल गोस्वामी हा आपल्या मोबाइल वर व्हिडियो शुट करतांना इंद्रावती कुर्मी यांची मुलगी कु.दीपिका कुर्मी हिने मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. इंद्रावती कुर्मी हीने थांबवणारा तु कौन आहेस. असे म्हणत जातीवाचक शब्दाचा वापर करुन सुरक्षा रक्षक बल्लन गोस्वामी च्या मागे चप्पल घेऊन धाव घेतली.व शिवीगाळ करून कानशिलात झापड मारुन, जीवे मारण्याची धमकी दिली.

 पोलीसांनी परशुराम गौतम यांचा तक्रारी वरून इंद्रावती कुर्मी, कु.दिपीका कुर्मी दोन्ही रा.खदन नंबर ६ यांचा विरुद्ध अप क्रमांक ८९/२३ कलम ३९२ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ भांदवि सहकलम ३(१)(r)३(१)(s)३(२)(va) अ.जा.ज.अ.प्र.का अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रेल्वे मालधक्का स्थानांतरण करण्यासाठी ठीया आंदोलन  

Mon Mar 6 , 2023
रेल्वे मालधक्का स्थानांतरण करण्यासाठी ठीया आंदोलन कन्हान,ता.०५ मार्च      कन्हान शहरातील मुख्य गवहीवरा टी पॉइंट,चौकात असलेला रेल्वे माल धक्कया मुळे स्थानिक नागरिकांसह, लहान‌ मुलांना व वृद्ध व्यक्तींना‌‌ मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धुळीचा विविध आजारांची समस्या निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर वाहतूक थांबवून ठीया आंदोलन केले.       […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta