निलज ला जागतिक महिला दिन थाटात साजरा
एकलक्ष महिला ग्रामसंघ, ग्रा.प.निलज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा.
ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे १९० महिलांना साडी सप्रेम भेट
कन्हान,ता.०८ मार्च
एकलक्ष महिला ग्राम संघ व ग्राम पंचायत निलज यांच्या संयुक्त विद्यमाने निलज येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलीचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांना मार्गदर्शन आणि २४ स्वयंम सहाय्यता महिला गटाच्या महिलांना ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे १९० साडया सप्रेम भेट देत महिलांचा सत्कार करीत जागतिक महिला दिन थाटात साजरा करण्यात आला.
बुधवार (दि.८) मार्च ला दुपारी १ वाजता ग्रा.प.निलज च्या पटांगणात एकलक्ष महिला ग्रामसंघ व ग्रा.प. निलज च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. जागतिक महिला दिन कार्यक्रम माजी खासदार, ग्रामोन्नती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश भाऊ जाधव यांचे अध्यक्षेत आणि प्रमुख अतिथी गोंडेगाव-साटक जि.प.सदस्य व्यंकटेश कारेमोरे, बनपुरी निलज प.स.सदस्य नरेश मेश्राम, ग्रा.प.निलज सरपंच सुनिल डोंगरे, उपसरपंच गुंडेराव भुते, एकलक्ष ग्राम संघ भारती कुंभलकर, अध्यक्षा कल्याणी कारेमोरे आदी मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, भारत माता, झाशीची राणी, सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते कोठीराम चकोले, माजी सरपंच डोमाजी चकोले, देवराव चकोले, दुर्योधन चकोले, पोलीस पाटील गुंडेराव चकोले, रमेश चकोले, प.स. पारशिवनी चे अकुंश शुक्ला, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव चकोले, ज्ञानेश्वर चकोले, ग्रामोन्नती उपाध्यक्ष दिलीप राईकवार, सचिव मोतीराम रहाटे, पत्रकार कमलसिंह यादव, ग्रा.प.सदस्य शिवराम धावडे, धनराज चकोले, रामचंद्र चकोले, ग्रा प सदस्या राजकन्या चकोले, सीमा देशमुख, बेबी मेश्राम, उमा टोहणे, रंजना शेंदुरकर आदी प्रामु़ख्याने उपस्थित होते. यावेळी लहान मुलीनी भाषण, नुत्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. मा.प्रकाश भाऊ जाधव सह मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजेंद्र मुळक प्रतिष्ठान तर्फे स्वयंम सहायता महिला बचत गटाला हिरवी चटई व दोन पाण्याच्या कँन भेट देण्यात आले. तसेच निलज येथील एकलक्ष ग्राम संघ अंतर्गत २४ स्वंयम सहाय्यता महिला गटाच्या महिलांना ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव यांनी १९० महिलांना साडी सप्रेम भेट देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अर्चना गुंडेराव भुते यांनी सुंदर प्रास्ताविकातुन महिलां दिनाचे महत्व स्पष्ट केले. सुत्रसंचालन अंजना संभाजी चकोले यांनी तर भारती फजितराव कुंभलकर यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रविंद्र चकोले, आशिष चकोले, फजितराव कुंभलकर, ग्राम संघ सचिव अरूणा पाहुणे, वैशाली चकोले, ग्रा.प.निलज पदाधिकारी, सदस्य व एकलक्ष महिला ग्राम संघा च्या पदाधिकारी, महिला सदस्या व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
Post Views: 677
Sat Mar 18 , 2023
मूकबधीर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न. सावनेर : मंगल बहुउद्देशीय शिक्षण,तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मूक बधिर निवासी शाळा सावनेर च्या वतीने मूक बधिर विद्यार्थ्यांकरीता जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा क्रीडा संकुल सावनेर येथे संपन्न झाल्या.बॅडमिंटन स्पर्धेच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ.योगेश […]