प्रा.प्रिया अतकरे यांना “इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने सम्मानित
कन्हान,ता.३० मार्च
वच्छलागोपी पब्लिक स्कूल कन्हान- कांद्रीच्या प्राचार्या श्रीमती प्रिया अतकरे मॅडम यांना ऑनलाइन १४ देशांमधून “इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड २०२३” वर्षातील उत्कृष्ट नेतृत्व प्रिन्सिपल साठी पुरस्काराने गौरव करण्यात आला.
वी.जी.पी.एस.स्कुलच्या प्राचार्य प्रिया अंकुर अतकरे यांचे कौतुकास्पद अभिनंदन व सम्मानित करीत बुधवार ( दि.२९) मार्च रोजी वच्छलागोपी पब्लिक स्कूल कन्हान- कांद्रीच्या पटांगणात शाळेच्या संचालिका सौ.शालिनी लीलाधर बर्वे मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
प्राध्यापक पदावर गेली वीस वर्ष विविध शाळा- विद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी कामठी तालुक्यात व नागपूर जिल्ह्यात अनेक समाजातील उपक्रम राबविले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी शहरीभाग सोडून ग्रामीण भागात शैक्षणिक कार्य स्वीकारले. विद्यालयात अनेक विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
याव्यतिरिक्त हा पुरस्कार उत्कृष्ट नेतृत्व प्राचार्य पुरस्कार प्रख्यात मुख्याध्यापकांना त्यांच्या यशासाठी आणि त्यांच्या शाळेतील योगदानासाठी सन्मानित करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी तयार केला गेला आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांची कामगिरी वाढवण्यासाठी, सुरक्षित शैक्षणिक वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान बाबत अंतर्गत आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्काराने आयोजित संस्थानाने त्यांना पुरस्कारासाठी निवड केली आहे. या स्पर्धेत अंतरराष्ट्रीय पातळीवर १४ देशातील प्रिन्सिपल ऑनलाइन सहभागी होते. मात्र प्रा.प्रिया अंकुर अतकरे यांनी पुरस्कार पटकावला. यावेळी शैक्षणिक व सर्व स्तरावरून अभिनंदनच्या वर्षाव होत आहे. शाळेचे संचालिका सौ.शालिनी लीलाधर बर्वे मॅडम यांनी अतकरे यांच्या गौरव करीत शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगितले, प्रसंगी वरीष्ठ शिक्षिका लीजा टायटस, शाळेचा शिक्षिका, कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थीगण उपस्थित होते.
Post Views: 828
Thu Mar 30 , 2023
कन्हान नदी नविन पुलाच्या दोन कप्याच्या जोड मध्ये धोकादायक अंतर नविन पुलावरील गड्डे,भेगा,दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्नचिन्ह कन्हान,ता.३० मार्च नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असता पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले. आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन […]