कन्हान नदी नविन पुलाच्या दोन कप्याच्या जोड मध्ये धोकादायक अंतर
नविन पुलावरील गड्डे,भेगा,दोन कप्याच्या जोड मध्ये वाढलेले अंतराने बांधकामावर प्रश्नचिन्ह
कन्हान,ता.३० मार्च
नदीवर नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊन फक्त सहा महिने झाले असता पुलावर दोन ते तीन वेळा मोठ मोठे गड्डे पडले. आता कप्याच्या जोड मध्ये चांगले अंतर वाढुन धोकादायक परिस्थिती असल्याने राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांचे कार्यप्रणाली आणि पुलाचा बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी अधिकारी यांना पुलाची समस्या दाखवुन चर्चा करुन दहा दिवसांत नविन पुलाचे व्यवस्थित काम करण्याची मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कन्हान नदी नवनिर्मित पुलाचे भुमिपुजन २०१४ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते व तत्कालीन खासदार मुकुल वासनिक यांचा प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. नविन पुल ३ वर्षात पुर्ण होण्याचे आश्वस्त केल्यानंतर मध्यंतरी घडलेल्या राजकीय घडामोळीने पुलाचे कार्य संधगतीने सुरु होते. पुलाचे बांधकाम ताराकुंड कंपनी द्वारे करण्यात आले. पुलाच्या बांधकामा ला जवळपास आठ वर्ष लागली.
१ सप्टेंबर २०२२ ला केंद्रीय मंत्री मा. नितिन गडकरी यांच्या हस्ते नवनिर्मित पुलाचे उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर या पुला वरुन दिवसरात्र वाहनांची वाहतुक सुरु झाली. दोन ते तीन वेळा पुलावर गड्डे पडुन सळाखी बाहेर आल्याने वाहन चालकांना बराच त्रास सहन करावा लागल्याने या गड्यामुळे निर्दोष वाहन चालक रोडवर पडुन गंभीर जख्मी होऊन अपंगत्व पत्कारण्यास भाग झाले. या विषयी बातमी प्रकाशित होताच गड्डे सिमेंट ने फक्त लीपापोती करण्यात आली. पुलावर जागो जागी खड्डे, भेगा पडत आहे. मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढु लागली. सदर विषयाला गांभीर्याने घेत विविध संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिय जनप्रतिनिधी व संबंधित अधिका-या मार्फत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन पाठुन पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तरी सुद्धा जनप्रतिनिधि, संबंधित विभागाच्या अधिका-यांनी याकडे दुर्लक्ष केले. आता तर नविन पुलाच्या दोन कप्यात च्या जोड मध्ये चांगलेच अंतर येऊन नदीतील पाणी दिसु लागले आहे. हे अंतर इतके आहे की त्याच्या पाय किंवा सायकलचे चाक जाऊन अपघात होऊ शकतो. दोन कप्याच्या जिथे जोड आहे त्यात वाढलेल्या अंतरामुळे पुलाच्या भविष्यावर प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिय माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी राष्ट्रीय महामार्गा चे अधिकारी बोरकर यांच्याशी फोन करून बोलविल्याने त्यांचे कनिष्ट अधिकारी प्रकाश ठाकरे यांना नविन नदी पुलावर पाठविल्याने पुलाचे निकृष्ट काम दाखवुन संभाव्य धोक्या विषयी मा.प्रकाश जाधव यांनी या पुलाच्या बांधकामास जसा कंत्राट दार दोषी आहे, तेवढेच संबधित अधिकारी दोषी असल्याने या पुलाची व्यवस्थित निरिक्षण करून तांत्रिक दुष्टया तुटयाची त्वरित दुरूस्ती करावी. जेणे करून या पुलावर कुठलिही समस्या होणार नाही. दोन कप्यात वाढलेले अंतरावर त्वरित व्यवस्थित उपाय करावा अन्यथा ११ दिवसांनी उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप पोटभेरे, पत्रकार व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.
Post Views: 1,035
Sun Apr 2 , 2023
आंबेडकर चौक,कन्हान येथे मा.शरद पवार यांचे जोरदार स्वागत कन्हान,ता.०२ एप्रिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे भव्य स्वागत करण्यात आले. मा.शरद पवार साहेब भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री राहिले असुन महाराष्ट्र राज्याचे […]