गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिबिराचा शुभारंभ
कन्हान,ता.२५ एप्रिल
राम सरोवर टेकाडी (को.ख) येथे गुरुकृपा आखाडा व्दारे उन्हाळी शिवकालीन शस्त्र विद्याकले चे प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.
गुरुकृपा आखाडा व्दारे रामसरोवर टेकाडी येथे उष्मकालीन शिवकालीन शस्त्र विद्या कला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली. भारतीय प्राचिन युध्दकला प्रशिक्षण केंद्र. ज्या युध्द कलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महिलांसाठी आत्मविश्वास वाढविणारी व संरक्षणासाठी उपयुक्त असलेली शिवकालीन मर्दानी आखाडा कला शिकण्याची संधी शिबीरातील विद्यार्थ्याना उपलब्ध करण्यात आली आहे.
यात आत्मरक्षा प्रशिक्षण, संस्कार शिबीर, व्यक्तीमत्व विकास, शैक्षणिक मार्गदर्शन, आष्टेडु आखाडा, योगासन, शौर्य शिबीर, कलारी पटु, आत्मनिर्भर, भारतीय शिव कालीन शस्त्र विद्येत भाला, बाणा, ढाल-तलवार, दांड पट्टा, विटा, माडु , परशु , निशस्त्र युध्द या सर्व कलेचे प्रशिक्षण शिवशक्ती आखाडा नागपुरचे वस्ताद हीतेश डफ, वस्ताद अशोक वकलकर, योगगुरू किशोर गाडगे, गुरूकृपा आखाडा चे निलेश गाढवे, थोर पुरुष विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्रविण चव्हाण, शिवकृपा आखाडा वस्ताद अभिजीत चंदुरकर आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन देत आहे. शिबीराला विद्यार्थ्यांची चांगली उपस्थित आहे.
Post Views: 677
Wed Apr 26 , 2023
खंडाळा येथे लाखोंचा विकासनिधी आ.जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामाचे भूमिपूजन कन्हान, ता. २५ पारशिवनी तालुक्यातील खंडाळा घाटे येथे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. जल जिवन मिशन कार्यक्रमांतर्गत ६९ लाख ८४ हजाराच्या निधीतून २० हजार लिटर पाण्याची टाकी आणि ४ हजार १०० मीटर […]