वेकोली खदान नं.६ ला गोळीबार झाल्याची चर्चा
कन्हान,ता.३ जुन
परिसरातील कोळसा खदान नं.६ येथे काही समाजकंटक तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची बाब समोर आली असुन सध्या परिसरात चांगलीच चर्चा असुन कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करित आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.३) जुन ला दुपारी कोळसा खदान नं.६ खदान टेकाडी, गोंडेगाव कडे जाणा-या रस्त्याकडे काही समाजकंटक तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती शहरात वाऱ्या सारखी पसरल्याने परिसरातील नागरिकां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोळीबाराची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, मुदस्सर जमाल, हरीश सोनभद्रे, वैभव बोरपल्ले, सम्राट वनपर्ती यांनी घटनास्थळ गाठुन पाहणी केली. मात्र घटनास्थळी पोलिसांना कोणताही ठोस पुरावा मिळु शकला नाही. या घटने बाबत पोलिसांकडुन अफवा असल्याचे बोलले जात आहे. परंतु कोळसा खदान परिसरात हवेत गोळीबार करण्याचे प्रकार सामान्य झालेचे सांगितले जात आहे. घटनेची माहीती मिळताच नागपुर ग्रामिणचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी आशिष कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, कन्हान पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचुन पाहणी केली. या घटनेची शहरात उलटसुलट चर्चा सुरू असल्याने कन्हान पोलीसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हवेत किंवा कोणावर गोळीबार करण्यात आला. कुणालाही गोळी लागली नसल्याने हवेत गोळीबार किंवा अफवा असल्याचे तर बोलल्या जात तर नाही. यामुळे परिसरात नागरिकात भिती निर्माण होऊन चर्चा वा-या सारखी का पसरली ही सुध्दा चिंतनाचा विषय नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे. सध्या या घटनेचा पुढील तपास कन्हान पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करत असुन मात्र गोळीबाराचे आरोपी कन्हान पोलीस शोधु शकतील की अफवा पसरवणाऱ्यांवर काय कारवाई करणार ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
Post Views: 845
Tue Jun 6 , 2023
प्रेम संबंधाच्या वादातुन युवकावर चाकुने हल्ला कन्हान शहरात गुन्हेगारीत वाढ पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न कन्हान,ता.०६ जून परिसरातील हरीहर नगर, कांद्री येथे प्रेम संबंधाच्या वादातुन आरोपी आकाश राऊत याने कुणाल वरखडे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने पोलीसांनी कुणाल वरखडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी आकाश राऊत […]