विद्यार्थ्यांचा व्दारे अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती रैली
कन्हान,ता.२६ जुन
कन्हान-पिपरी पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात दहावी व बारावीच्या शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या व्दारे अंमली पदार्थ वापर करण्यावर आळा घालण्यासाठी तसेच त्यांचे दुष्य परिणामकारक विषयी कार्यशाळा घेण्यात आली. तसेच मार्गदर्शन करून अंमली पदार्थाचे दुष्य परिणामाचे फलक लावुन जनजागृती रैली काढुन २६ जुन अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.
( दि.७) डिसेंबर १९८७ ला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या झालेल्या आमसेभेत (दि.२६) जुन हा अंमली पदार्थाचे सेवन आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतर राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या संबंधाने पो स्टे कन्हान व्दारे सोमवार (दि.२६) जुन २०२३ रोजी पोलीस स्टेशन हद्दीतील खाजगी शिकवणी मित्रा कोचिंग क्लासेस, गणेश नगर, मोढे कोचिंग, क्लासेस शिवनगर, कन्हान या दोन्ही स्थळी अंमली पदार्थ वापरा संबंधी आळा घालण्याबाबत तसेच त्यांचे होणारे दुष्यपरिणाम बाबत कार्यशाळा घेऊन गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक यशवंत कदम यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
खाजगी शिकवणी वर्गातील ८० मुले, मुली एकत्रित करून त्यां च्या हातात दोन फ्लैंग देवुन कन्हान शहरातील मुख्य रस्त्यानी रॅली भ्रमण करित पोलीस स्टेशन कन्हान येथे पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पोलीस स्टेशन कन्हान परीसरातील तारसा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशन कन्हान परिसरात दर्शनिय स्थळी बॅनर लावण्यात आले तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण येथुन प्राप्त झालेले बॅनर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ बंद टोल नाका येथे लावण्यात आलेले आहे.
पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत औषधी विक्री केंद्र चालक यांना डिन, टॅमेझोन व अल प्रायझोलम इत्यादी औषधी विक्री केंद्रात होणाऱ्या इग्स ची अवैधरित्या विक्री होणार नाही. औषधी दुका नात सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्या बाबत, आणि १८ वर्षां खालील मुला-मुलींना वरील प्रकारचे औषधी विक्री करु नये असे सुचित करण्यात आले. प्रत्येक मेडीकल पदाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. अशा विविध कार्यक्रमाने पोलीस स्टेशन कन्हान येथे अमली पदार्थ वापरासंबधाने आळा घालने व त्यांचे होणारे दुष्प परिणामा संबंधी जनजागृती करून अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कन्हान पोलीस स्टेशन थानेदार प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा पो नि यशवंत कदम यांचे नेतुत्वात महिला, पुरूष पोलीस कर्मचारी वृंद व वाहतुक पोलीस यांनी सहकार्य केले.
Post Views: 733
Wed Jun 28 , 2023
नवनिर्मित कन्हान नदी पुलावर साचले पावसाचे पाणी , बांधकामाची पोल खोल कन्हान,ता.२६ जून २०१४ नदी वरील नवनिर्मित पुलाचे उद्घाटन होऊ न फक्त दहा महिने झाले. या दहा महिन्यात पुलावर खुप वेळा मोठ-मोठे गड्डे पडुन सळाखी बाहेर दिसुन आले, रस्त्याचा मधात गॅप दिसुन आली आणि आता पुलावर पावसाचे पाणी साचल्याने […]